Benjamin Netanyahu VIDEO : आईशप्पथ एकदम सेम टू सेम! बेंजामिन नेत्यान्यांहूसारखा दिसणारा दुकानदार; फोटो आणि व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्यासारखा एकदम सेम टू सेम दिसणारा व्यक्ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले आहेत.

Benjamin Netanyahu VIDEO  : आईशप्पथ एकदम सेम टू सेम! बेंजामिन नेत्यान्यांहूसारखा दिसणारा दुकानदार;  फोटो आणि व्हिडिओ पाहून नेटकरीही चक्रावले
Benjamin Netanyahu VIDEO
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 16, 2026 | 4:05 PM

एखाद्या व्यक्तीचा चेहरा दुसऱ्या व्यक्तीशी मिळता – जुळता असणं काही नवीन नाही. पण एखादा सामान्य माणूस थेट जर एखाद्या देशाच्या पंतप्रधानासारखा दिसू लागला तर? चर्चा तर होणारचं ना! सध्या अशाच एक दुकानदार सोशल मीडियावर चर्चेत आहे. विशेष म्हणजे हा दुकानदार दुसऱ्या कोणत्याही देशात नाही तर इराणमध्येच असल्याची माहिती आहे. त्याचा चेहरा पाहून प्रत्येकाला इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुकानात वजनकाट्याच्या मागे बसलेली दिसते. हे दुकान सुका मेवा, विविध प्रकारचे मेवे आणि मिठाई विकणारं असल्याचं संगितलं जात आहे. इराणची राजधानी तेहरानमधील या दुकानदाराऱ्या चेहऱ्याची ठेवणं, केसांची रचना आणि हावभाव नेत नेतन्याहू यांच्याशी मिळते- जुळते असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading...

 

 

सुरूवातीला या साम्याची चर्चा गंमत आणि मीम्सच्या माध्यमातून सुरू झाली. काहींनी तर हा दुकानदार आणि नेतन्याहू यांच्या चेहऱ्याची तुलना करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या . त्यानंतर काही सोशल मिडिया वापरकर्त्यांनी या व्यक्तीची ओळख आणि त्याच्या दुकानाचा पत्ताही शोधण्याचाही प्रयत्नही केला.

या व्हिडिओबाबत आणखी एक प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा व्हिडिओ खरा आहे की कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मदतीनं तयार करण्यात आला आहे? काही सोशल मिडिया वापरकर्त्यांनी तो AI च्या माध्यमातून बनवला किंवा बदलला असण्याची शक्यता व्यक्त केली, मात्र याबाबत ठोस पुरावा समोर आलेला नाही. दुकानाची खरी ओळख, दुकानाचं अचूक ठिकाणं आणि व्हिडिओ कधी शूट केला गेला आहे याची संपर्ण माहिती समोर आलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us