AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: भावाची चप्पल तुटली, त्यानंतर त्याने असा जुगाड केला, की आता पाय तुटेल पण चप्पल नाही!

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक माणूस त्याच्या तुटलेल्या चप्पलमध्ये नटबोल्ट फिक्स करत आहे.

Video: भावाची चप्पल तुटली, त्यानंतर त्याने असा जुगाड केला, की आता पाय तुटेल पण चप्पल नाही!
नट बोल्ट लावलेली स्लीपर
| Edited By: VN | Updated on: Nov 13, 2021 | 2:43 PM
Share

सोशल मीडियावर जुगाडाचे व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात, ज्यांना यूजर्सना खूप पसंती देतात. हे व्हिडीओ पाहून आपण जिथे अनेक वेळा आश्चर्यचकित होतो, त्याचवेळी हे जुगाड पाहून आपण थक्क होतो. अलीकडच्या काळात असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की, याला म्हणतात खऱा जुगाडी इंजिनिअर. (Jugaad Video of Man use nut bolt to repair broken slippers video goes viral on social media indian jugaad )

जगातील काही लोक असे असतात ज्यांना तुम्ही कोणतेही कठीण काम देता, पण ते करण्यासाठी ते जुगाडाचा वापर करतात. त्यांची कलाकृती पाहून भले भले अभियंतेही क्षणभर थक्क होतात, आजकाल असाच काहीसा प्रकार समोर आला आहे, ज्यात एकाने तुटलेली चप्पल दुरुस्त करण्यासाठी असा जुगाड अवलंबला आहे, ज्याला पाहून तुम्हीही म्हणाल, ‘भावा आता पाय तुटतील, पण चप्पल तुटणार नाही.”

तुटलेली चप्पल दुरुस्त करण्याचा मजेदार जुगाड

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक माणूस त्याच्या तुटलेल्या चप्पलमध्ये नटबोल्ट फिक्स करत आहे. चपलेचा अंगठा आणि बोटांमध्ये तळाला जोडण्यासाठी तो मोठे नट-बोल्ट बसवतो. जेणेकरून त्याची चप्पल कधीही तुटू नये…! हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की आहे की तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटेल.

हा व्हिडिओ पाहा

View this post on Instagram

A post shared by Tahreem Anam (@tahreemanam)

सोशल मीडियावर या जुगाडचा हा व्हिडिओ पाहून आश्चर्य वाटेल. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘हे नट-बोल्ट्स फक्त जड वस्तू जोडण्यासाठी वापरले जात असले तरी एक गोष्ट निश्चित आहे की, चप्पलमध्ये बसवल्यानंतर आता चप्पल कधीही तुटणार नाहीत. ‘ तर दुसऱ्या युजरने लिहिले, ‘भाऊ! हा जुगाडाचा मास्टर आहे.’ दुसर्‍या यूजरने लिहिले, ‘हा जुगाड पाहिल्यानंतर मी फेविक्विकलाही विसरलो आहे.’ याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

हा व्हिडिओ @tahreemanam नावाच्या इंस्टाग्राम यूजरने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

हेही पाहा

Video: तामिळनाडूत जखमी तरुणाला लेडी सिंघमने खांद्यावरुन रुग्णालयात दाखल केलं, पण…

Video: बेडकासोबतचा चिमुरडीचा क्युट व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, प्राण्यासोबतचं हे नातं खरंच गोड आहे

 

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...