AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: तामिळनाडूत जखमी तरुणाला लेडी सिंघमने खांद्यावरुन रुग्णालयात दाखल केलं, पण…

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक 'लेडी सिंघम' एका बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेण्यात मदत करत असल्याचे दिसून येते.

Video: तामिळनाडूत जखमी तरुणाला लेडी सिंघमने खांद्यावरुन रुग्णालयात दाखल केलं, पण...
जखमी तरुणाला खांद्यावरुन नेणारी लेडी सिंघम
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 2:26 PM
Share

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा असे व्हिडिओ दिसतात. जे पाहून प्रत्येकाच्या हृदयात जागा निर्माण होते. तमिळनाडूमधून असाच एक शौर्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तामिळनाडूतील पावसादरम्यान लेडी सिंघमचा राजेश्वरीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती महिला पोलिस निरीक्षक अतिशय धाडसी काम करत आहे. ज्याचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. लोकांनी या लेडी सिंघमला ‘रियल हिरो’चा टॅग दिला आहे. ( Viral Video of Lady Singham in tamilnadu who resue a injured man the real hero everyone is appreciating watching the video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक ‘लेडी सिंघम’ एका बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेण्यात मदत करत असल्याचे दिसून येते. पण आता त्या व्यक्तीशी संबंधित दु:खद बातमी समोर आली आहे की, महिला पोलीस निरीक्षक राजेश्वरी यांनी रुग्णालयात नेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा व्हिडीओ तेव्हाचा आहे जेव्हा राजेश्वरीने बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला खांद्यावर बसवून ऑटोमध्ये हॉस्पिटलमध्ये पाठवले. त्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला, तो व्हायरल होताच राजेश्वरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सीएम स्टॅलिन यांनीही राजेश्वरीचे कौतुक केले होते.

व्हिडिओ पाहा:

व्हिडिओ शेअर करताना ANI ने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तामिळनाडू: चेन्नईतील महिला पोलिस निरीक्षक राजेश्वरी यांनी एका बेशुद्ध पडलेल्या माणसाला खांद्यावर उचलेले आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले’ व्हिडिओवर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, एका युजरने लिहलं की, ‘लेडी इन्स्पेक्टरचे धाडस वाखाणण्याजोगे आहे’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘पोलिसांची हे काम कुणीही सांगत नाही… अशा शूर अधिकाऱ्याला सलाम. तिसर्‍या वापरकर्त्यावर कमेंट करताना लिहिले, ‘शूर महिला सैनिक, नारी शक्तीचे आभार’ या व्हिडिओवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स देखील पाहिल्या जात आहेत.

त्या महिला इन्स्पेक्टरने मदत केलेल्या व्यक्तीचे नाव उदय कुमार होते. त्यांचे वय 25 वर्षे होते. उदयला चेन्नईच्या किलपॉक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असले तरी त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा:

Viral Video | सापाचं असं रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल, पाहा हा खास व्हायरल व्हिडीओ

Video : लग्न समारंभात नवरीऐवजी नवऱ्याच्याच डोळ्यात अश्रू! व्हिडीओ व्हायरल

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.