AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | सापाचं असं रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल, पाहा हा खास व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज नवीन आणि कधीकधी अत्यंत विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. अशा गोष्टी ज्याबाबत आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इंटरनेटवर मजेशीर व्हिडीओ आढळतात, जे लोकांना पुन्हा पुन्हा पहायला आवडतात. साप हा असा प्राणी आहे ज्याला पाहिल्यावर भले भले घाबरतात. पण, सध्या सापाचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जे पाहून तुम्हाला अश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Viral Video | सापाचं असं रुप तुम्ही कधीही पाहिलं नसेल, पाहा हा खास व्हायरल व्हिडीओ
Viral Video Of Snake
| Edited By: | Updated on: Nov 12, 2021 | 2:07 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर दररोज नवीन आणि कधीकधी अत्यंत विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. अशा गोष्टी ज्याबाबत आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इंटरनेटवर मजेशीर व्हिडीओ आढळतात, जे लोकांना पुन्हा पुन्हा पहायला आवडतात. साप हा असा प्राणी आहे ज्याला पाहिल्यावर भले भले घाबरतात. पण, सध्या सापाचा एक असा व्हिडीओ व्हायरल झाला आहे जे पाहून तुम्हाला अश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओमध्ये एक साप हसत हसत अप्रतिम एक्सप्रेशन देताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकरींच्या खूप पसंतीस पडत आहे आणि वापरकर्ते या व्हिडीओचा आनंद घेत मजेदार प्रतिक्रिया देखील देत आहेत.

समोर साप येताच कुणीही घाबरणे साहाजिकच आहे. कारण, तो ज्याप्रकारे टक लावून पाहतो ते पाहून कोणालाही भीती वाटेल. मात्र, या व्हिडीओमध्ये तुम्हाला सापाचे वेगळेच रुप पाहायला मिळणार आहे. काही सेकंदांच्या या क्लिपमध्ये बॉक्सच्या आत एक साप बसलेला दिसतो. त्याचवेळी एक व्यक्ती सापाचा व्हिडीओ बनवत आहे. आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे हा साप व्हिडीओ बनवतो आणि फनी एक्स्प्रेशन्सही देतोय. सापाकडे बघून तो हसतोय असे वाटते.

पाहा हा व्हिडीओ –

सापाचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे, लोक यावर लाइक्स आणि कमेंट्सद्वारे भरभरुन प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडिया यूजर्सनी हा व्हिडिओ इतर प्लॅटफॉर्मवर देखील शेअर केला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही royal_pythons या खात्यावर हा व्हिडीओ पाहू शकता. या मजेशीर व्हिडीओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

एका यूजरने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, ‘हा साप खूप सुंदर आणि अनोखा आहे’. कोणी लिहिले की, हा खूप सुंदर आहे, तर कोणी म्हणतो की तो खूप धोकादायक देखील आहे. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘साप अत्यंत धोकादायक असतो, एवढ्या जवळ जाऊन कोण त्याचा व्हिडीओ बनवू शकतो’ याशिवाय व्हिडिओवर अनेक इमोजीही पाहायला मिळत आहेत.

संबंधित बातम्या :

Video : लग्न समारंभात नवरीऐवजी नवऱ्याच्याच डोळ्यात अश्रू! व्हिडीओ व्हायरल

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.