Viral Video : अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरडीने तबल्यावर धरली लय! स्वरश्री हेगडेची थाप ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’पर्यंत पोहोचली

२ वर्षांच्या स्वरश्री हेगडेने आपल्या अद्भूत तबला वादनाने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले आहे. तिचा तबला वाजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.नेटकऱ्यांकडून 'साक्षात देवीचे रूप' म्हणत भरभरून कौतुक होत आहे.

Viral Video : अवघ्या 2 वर्षांच्या चिमुरडीने तबल्यावर धरली लय! स्वरश्री हेगडेची थाप इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सपर्यंत पोहोचली
Swarshree Hegde viral video
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 26, 2026 | 2:18 PM

वय फक्त 2 वर्ष… या वयात बाळं साधं नीट बोलतही नाही. खेळायला आणि छोटया छोट्या गोष्टी शिकायला सुरूवात करत असतात. पण कर्नाटकातील 2 वर्षांच्या स्वर्श्री हेगडेने तबल्यावर अशी लय धरली आहे की तिची दखल थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली. सोशल मीडियावर तिच्या या वादनाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एवढ्या लहान वयात तिचं हे कौशल्य सर्वांच लक्ष वेधून घेणारं आहे.

स्वरश्री हेगडे ही कर्नाटकच्या उत्तर कन्नड च्या होन्नावर गावची रहिवासी आहे. चिमुरड्या वयात तिच्यावर झालेले हे संगीताचे संस्कार वाखण्याजोगी आहेत.इतक्या लहान वयात तबला वाजवणं आणि त्याची नोंद थेट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणं हे काम भल्याभल्यानांही जमत नाही. कित्येकांना हे यश प्राप्त करण्यासाठी अनेक वर्षे जातात.पण या मुलीने फक्त 2 वर्ष 12 महिन्यात हे यश प्राप्त केलं आहे.

Loading...

तबला वाजवताना केवळ हाताने थाप मारून चालत नाही. त्यातून योग्य आवाज येण्यासाठी ताल, लय आणि हातांची हालचाल यांचा मेळ साधावा लागतो. मोठ्यांनाही हे शिकण्यासाठी अनेक वर्षे सराव करावा लागतो. अशा वेळी दोन वर्षांच्या चिमुरडीने तबल्यावर आपली लय दाखवणे ही विशेष बाब ठरते.

 

 

सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिने लाखो लोकांचे मन जिंकले आहे. या व्हिडिओमध्ये मुलीचा निरागसपणा पाहून, तिची तबला वाजवण्याची धडपड पाहून नेटकरी तिच्यावर भलतेच खूश झाले आहेत. एका यूजरने ‘ ही मुलगी साक्षात देवीचे रूप वाटतं आहे’ असं म्हटलंय. तर दुसऱ्याने तिच्या आई वडिलांच्या संस्कारांच कौतुक केलं आहे, ‘ आई वडिलांना माहित होतं की आपली मुलगी संगीतात पारंगत होणार म्हणूनच तिच नाव स्वरश्री ठेवलं. तर दुसऱ्याने म्हटलंय की मुलगी बहुतेक आईच्या पोटातूनच संगीत शिकून आली असावी.

स्वरश्रीच्या तबला वादनाची ही गोष्ट एका वाक्याची आठवण करून देते की – संगीताला वयाची मर्यादा नसते. योग्य वातावरण, प्रोत्साहन आणि सरावाची संधी मिळाली ,तर अगदी लहान वयातही मुलं आपल्यातील कौशल्य दाखवू शकतात

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us