AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Deo: ट्रक भरून बायका यायच्या… अजिंक्य देव यांचा त्या सिनेमाबाबत मोठा खुलासा

Ajinkya Deo: मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीमधील एका चित्रपटाविषयी सांगितले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी बायका अक्षरश: ट्रक भरून येत असत असे ते म्हणाले.

Ajinkya Deo: ट्रक भरून बायका यायच्या... अजिंक्य देव यांचा त्या सिनेमाबाबत मोठा खुलासा
Ajinkya DeoImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 26, 2026 | 2:15 PM
Share

एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये अजिंक्य देव यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहेत. नुकताच अजिंक्य देव यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एका सिनेमाचा किस्सा सांगितला आहे. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी अक्षरश: महिला ट्रक भरुन येत असता. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हा नेमका कोणता चित्रपट आहे?

आम्ही मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय हिट सिनेमा माहेरची साडी या सिनेमाविषयी बोलत आहोत. या सिनेमाविषयी एका मुलाखतीत बोलत असताना अजिंक्य देव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी हा चित्रपट एका गुजराती सिनेमाचा रिमेक असून तो पाहण्यासाठी महिला अक्षरश: ट्रक भरुन येत असत असे म्हटले आहे. आता नेमकं काय म्हणाले चला जाणून घेऊया…

काय म्हणाले अजिंक्य देव?

मुलाखतीमध्ये माहेरची साडी सिनेमाविषयी बोलताना अजिंक्य देव म्हणाले की, माहेरची साडीमध्ये विजूने जे कनसिव्ह केलं होतं ना चित्रपट तो रिमेक होता गुजराती चित्रपटाचा. ‘महिअर नी चूनडी’ नावाचा चित्रपट होता. तो एवढा तिकडे चालला नाही. त्याचे राईट्स विजूने घेतले आणि मग हा चित्रपट बनवला. त्याच्यामध्ये तो जो हात जातो माझा.. डावा हात… आणि ती म्हणते भावा तुझा हात.. तेव्हा मी म्हणतो माझा उजवा हात आहे ना हा घे..

पुढे अजिंक्य देव म्हणाले की, सो या सगळ्या भावना आहेत बहिणीच्या आणि भावाच्या लोकांना आवडल्या… तीन आठवडे सातारा, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर अशा चार ते पाच ठिकाणी राऊंड द क्लॉक शो झाले. 12 3 6 9, 12 3 6 9 असे शो.. ट्रक भरून बायका यायच्या… ट्रक भरून… बाहेर बायकांची रांग लागलेली असायची थिएटरच्या.

माहेरची साडी सिनेमाविषयी

माहेरची साडी हा सिनेमा 1991मध्ये प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा त्यावेळी सुपरहिट ठरला होता. लोक हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटर बाहेर गर्दी करत होते. कित्येक महिने या चित्रपटाचे शो हे हाऊस फूल झाले होते. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री अल्का कुबल आणि अजिंक्य देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केले आहे.

Follow Us
आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान
Tulja Bhavani Temple : आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा पूर्ण, पहाटे पुन्हा सिंहासनावर विराजमान; तुळजापुरात भक्तीमय वातावरण
मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली
Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा
Raj Thackeray : महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय… राज ठाकरेंनी व्यक्त केली अपेक्षा; नेमकं काय म्हणाले?
तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल
Raj Thackeray : तो GDP चाटायचा का? राज ठाकरेंचा सरकारला खरमरीत सवाल; शहरांच्या नियोजनावर संताप
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल