AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : भल्यामोठ्या अजगराच्या अंगावर बसून खेळतोय चिमुकला, Video काढणाऱ्यावर संतापले लोक

Kid shocking video : कधी-कधी असे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरलही (Viral) होतात, जे पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एक लहान मूल (Kid) एका महाकाय अजगराच्या (Russell's Viper) वर बसून खेळताना दिसत आहे.

Viral : भल्यामोठ्या अजगराच्या अंगावर बसून खेळतोय चिमुकला, Video काढणाऱ्यावर संतापले लोक
अजगराच्या वर बसून खेळणारा चिमुकलाImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2022 | 10:39 AM
Share

Kid shocking video : कधी-कधी असे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरलही (Viral) होतात, जे पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. जे पाहत आहोत, ते खरे आहे की नाही याबद्दल तुम्हाला आश्चर्य वाटते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ ज्या कोणी पाहिला, त्याला धक्का बसू शकतो. अजगर आणि मुलाचा हा व्हिडिओ आहे. व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये एक लहान मूल (Kid) एका महाकाय अजगराच्या (Russell’s Viper) वर बसून खेळताना दिसत आहे. हे खरोखरच आश्चर्यकारक दृश्य आहे. साप किती धोकादायक दिसतो ते तुम्हाला ठाऊक आहे. काही सेकंदांची ही व्हिडिओ क्लिप पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक चिमुकला घराबाहेरील रस्त्यावर बसून एका मोठ्या अजगरावर खेळण्यासारखे खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भीती नाही वाटत

हे दृश्य पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. पुढच्याच क्षणी व्हिडिओत जे काही दिसत आहे, ते आणखीनच भीतीदायक आहे. लहान मूल अजगरावर बसून मजा करत असल्याचे आपण बघतो, तेव्हाच साप मुलाकडे जाऊ लागतो. सुदैवाने तो काही वेळाने थांबतो. पण मुलाला पाहून या महाकाय सापाची त्याला भीती वाटत नाही, असे दिसते. चला तर मग पाहू या हा आश्चर्यकारक व्हिडिओ.

इन्स्टाग्रामवर शेअर

rasal_viper नावाच्या अकाऊंटवरून हा अतिशय आश्चर्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. लोक आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहेत. यूझर्स ज्याने हा व्हिडिओ शूट केला, त्याच्यावर रागावले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतापले आहेत. एका यूझरने कमेंट करत लिहिले, की 10 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्यासाठी मुलाला मृत्यूच्या तोंडी देत आहात.’ त्याचवेळी दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की जोपर्यंत मुलाला अजगर इजा करत नाही, तोवर हे पाहण्यात मजा येईल. दुसऱ्या यूझरने व्हिडिओ शूट केलेल्या व्यक्तीला तुरुंगात पाठवा, असे म्हटले आहे. एकंदरीत, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण मुलाच्या पालकांबद्दल आणि व्हिडिओ बनवणाऱ्याबद्दल बरेच काही सांगत आहे.

आणखी वाचा :

Tiger Gava Clash : ह्या एका ‘झुंजी’पुढे सगळ्या ‘फाईल्स’ फिक्या, मेळघाटची ही ‘झूंड’ पाहिलात का?

Viral video : ‘जिवंत डायनासोर’ म्हणून परिचित असलेला ‘हा’ प्राणी आहे तरी कसा? वाचा सविस्तर

Viral : जेव्हा एक मगर दुसऱ्या मगरीवर हल्ला करते, ‘असा’ Video पाहिला नसेल

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.