Chandrapur | अबब! नऊ फूट लांब अजगर; रामाळा तलावातील मच्छिमार भयभित?

Chandrapur | अबब! नऊ फूट लांब अजगर; रामाळा तलावातील मच्छिमार भयभित?
मासेमाऱ्यांच्या जाळ्यात आलेला हाच तो नऊ फूट लांब अजगर

मासेमारी करत असलेल्या मच्छिमारांना बुधवारी सकाळी हा अजगर जाळ्यात अडकलेला आढळला. इको प्रो वन्यजीव संघटनेला घटनेची माहिती देताच पथक घटनास्थळी पोहोचले.

निलेश डाहाट

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 05, 2022 | 12:34 PM

चंद्रपूर : रामाळा तलाव चंद्रपूर जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा तलाव. या तलावाच्या सौंदर्याकरणासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला. शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा या तलावाला लाभलाय. पण, तलावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले होते. पाण्याला दुर्गंध येत होता. रोगराईला आमंत्रण देत होता. त्यामुळं या तलावाच्या खोलीकरणासाठी इको प्रो संस्थेनं आंदोलन केलं. अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. तेव्हा कुठे या तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू झाले. आता एक नवीनच प्रकार या तलावात उघडकीस आला.

मासेमारीच्या जाळ्यात अडकला

या तलावाचे सौंदर्याकरण व खोलीकरण सुरू आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरले आहे. त्यामुळं हे सौंदर्यीकरण करणे हे मोठे आव्हान आहे. सौंदर्याकरणादरम्यान बराच अनावश्यक मटेरीयल काढण्यात येत आहे. हेच काम सुरू असताना मासेमारीही सुरू आहे. या मासेमाऱ्यांच्या जाळीत हा फार मोठा अजगर सापडला. हा अजगर पाहून मासेमार घाबरले.

नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार

मासेमारी करत असलेल्या मच्छिमारांना बुधवारी सकाळी हा अजगर जाळ्यात अडकलेला आढळला. इको प्रो वन्यजीव संघटनेला घटनेची माहिती देताच पथक घटनास्थळी पोहोचले. या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचं ईको प्रो संघटनेचे प्रमुख बंडू धोतरे यांनी सांगितलं.

जाळे कापून काढले अजगराला बाहेर

अजगर येवढा मोठा होता की, जाळे कापून त्याला बाहेर काढावे लागले. पाहतात तर काय हा अजगर नऊ फूट लांबीचा. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. रामाळा तलावात भला मोठा अजगर आढळल्याने मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. आता मासेमारी कशी करायची असा प्रश्न त्यांच्यापुढं पडला आहे.

Buldhana | मुलगा नाही म्हणून रडत बसू नका; मलकापुरात मुलींनीच दिला वडिलांच्या चितेला मुखाग्नी!

Nagpur NMC | पाचशे चौरस फुटाच्या मालमत्तांची करमाफी होणार?; मनपाच्या करसंकलन समितीने घेतला महत्त्वाचा निर्णय 

Nagpur | वाद श्रेय कुणाचे यावरून! खंडाळ्यात सरपंच-आरोग्य कर्मचाऱ्यांत जुंपली; का व्हावं लागलं सरपंचाला गडाआड?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें