Nagpur NMC | पाचशे चौरस फुटाच्या मालमत्तांची करमाफी होणार?; मनपाच्या करसंकलन समितीने घेतला महत्त्वाचा निर्णय 

Nagpur NMC | पाचशे चौरस फुटाच्या मालमत्तांची करमाफी होणार?; मनपाच्या करसंकलन समितीने घेतला महत्त्वाचा निर्णय 
नागपूर महापालिका
Image Credit source: tv 9

राज्य शासनाचा हा निर्णय गोरगरिबांच्या हिताचा आहे. त्याची नागपूर शहरातही अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 05, 2022 | 9:51 AM

नागपूर : मुंबई महापालिकेने 500 वर्ग फुटाच्या मालमत्ताधारकांची करमाफी केली आहे. ठाणे महापालिकेनेही तशी पावले उचलली. आता नागपूर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन समितीने याबाबत एकमताने निर्णय घेतला आहे. हा ठराव महासभेकडे पाठविण्यात आल्यानंतर महासभा यावर निर्णय घेईल.

करसंकलन समितीने केला ठराव

नागपूर महानगरपालिकेने याबाबतचा ठराव पारित केला आहे. मंगळवारी करआकारणी व करसंकलन समितीची विशेष बैठक समिती सभापतींच्या कक्षात घेण्यात आली. बैठकीत करआकारणी व करसंकलन समिती सभापती महेंद्र धनविजय, उपसभापती सुनील अग्रवाल, सदस्य अनिल गेंडरे, सदस्या विशाखा मोहोड, शीतल कामडे आदी उपस्थित होते. राज्य सरकारने बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 500 चौक फूट अंतर्गत रहिवासी मालमत्तेचे मालमत्ता कर माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्य शासनाचा हा निर्णय गोरगरिबांच्या हिताचा आहे. त्याची नागपूर शहरातही अंमलबजावणी व्हावी, यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती सर्व सदस्यांनी सर्वानुमते राज्य शासनाच्या निर्णयान्वये नागपूर शहरातीलसुद्धा 500 वर्ग फूट मालमत्तांचे मालमत्ता कर माफ व्हावे, असा ठराव पारित केला.

काँग्रेससोबत भाजपनेही घेतला पुढाकार

राज्य सरकारने मुंबई ठाण्यात 500 चौरस फुटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय नागपूरसाठी का नाही म्हणत भाजपने मुद्दा उपस्थित केला. येणाऱ्या काळातील महापालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेसनेसुद्धा आपल्याच सरकारकडं मागणी केली. त्यामुळं आता निवडणुकीत फायदा मिळविण्यासाठी या मुद्द्यावर राजकारण सुरू झालंय.

मनपाचे 34 कोटी रुपयांचे होणार नुकसान

नागपूर शहरात 2 लाख 60 हजारच्या जवळपास नागरिक हे 500 फुटांपेक्षा लहान घरात राहतात. त्यापोटी मनपाला जवळ-जवळ 29 ते 34 कोटी रुपये कराच्या रुपात मिळतात. तो सरसकट माफ करावा, अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी केली. काँग्रेसने सुद्धा नागपुरातील 500 फुटांच्या घराचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी महाविकास आघाडी सरकारकडे केली. हा निर्णय झाल्यास महापालिका निवडणुकीत चांगला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना आपण पत्र लिहिलं असल्याचं महापालिकेतील विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे सांगतात.

NMC Election | नागपूर मनपा निवडणूक : 52 प्रभागांमध्ये 156 जागा, किती जागा राहणार महिलांसाठी राखीव?

Bhandara MLA | आमदारांचे शिवीगाळ प्रकरण : राजू कोरेमोरे बारा तासांच्या तुरुंगवासानंतर बाहेर; आता म्हणतात, पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार

Video – Nagpur | पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर राज्यकर विभागाचा लेटरबाँब; बांधकामात नऊ कोटींचा गैरव्यवहार झालाय?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें