Bhandara MLA | आमदारांचे शिवीगाळ प्रकरण : राजू कोरेमोरे बारा तासांच्या तुरुंगवासानंतर बाहेर; आता म्हणतात, पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार

Bhandara MLA | आमदारांचे शिवीगाळ प्रकरण : राजू कोरेमोरे बारा तासांच्या तुरुंगवासानंतर बाहेर; आता म्हणतात, पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार
भंडारा येथील तुरुंगातून बाहेर पडताना आमदार राजू कारेमोरे

अखेर तब्बल बारा तासांच्या तुरुंगावासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांची सुटका झाली. त्यांच्याविरोधात 31 डिंसेबरच्या रात्री मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोंधळ घातल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 04, 2022 | 1:50 PM

तेजस मोहतुरे

भंडारा : तब्बल 12 तासांच्या तुरुंगवासानंतर आमदार राजू कारमोरे यांची तुरुंगातून सुटका झाली. पोलिसाद्वारे 50 लाख रुपये व सोनसाखळी चोरीच्या भूमिकेवर आमदार ठाम आहेत. पोलिसांविरुद्ध न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धात कारेमोरे यांनी सुटकेनंतर व्यक्त केला.

मोहाडी न्यायालयाने सुनावली होती 15 जानेवारीपर्यंत कोठडी

अखेर तब्बल बारा तासांच्या तुरुंगावासानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे तुमसर मोहाडी क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे यांची सुटका झाली. त्यांच्याविरोधात 31 डिंसेबरच्या रात्री मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये येऊन गोंधळ घातल्या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मोहाडी दिवानी न्यायालयाने आमदार राजू कारेमोरे यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळं त्यांना भंडारा येथील तुरुंगात नेण्यात आले होते. कारेमोरे यांच्या वकिलांनी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सुटकेसाठी अर्ज दाखल केला.

रात्री नऊ ते सकाळी नऊ भंडाऱ्यातील कैदेत

या निर्णयाविरोधात राजू कोरेमोरे यांच्या वकिलांनी भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर भंडारा सत्र न्यायालयाने आमदार कारेमोरे यांचा अंतरीम जामीन पंधरा जानेवारीपर्यंत मंजूर केला. परंतु, सोमवारी रात्र झाली असल्यानं भंडारा येथील तुरुंगात कारेमोरे यांची रवानगी करण्यात आली होती. नियमानुसार, रात्री आरोपीची सुटका करण्यात येत नाही. त्यामुळं कारेमोरे यांना रात्र भंडाऱ्यातील तुरुंगातच काढावी लागली. आज सकाळी जामिनाची प्रत तुरुंगात दाखविल्यानंतर कारेमोरे यांची तुरुंगातून सकाळी नऊ वाजता सुटका करण्यात आली.

पोलीस आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवितात

पोलीस आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवित असल्याचा आरोप राजू कारेमोरे यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर केला. 50 लाख रुपये लुटून नेणाऱ्या पोलिसांना अधिकारी वाचवित आहेत. आमचे घामाचे पैसे आहेत. हरामाचे पैसे नाहीत. त्यामुळं आता ही लढाई कोर्टातून लढू असा पुनरुच्चार राजू कारेमोरे यांनी केला. पोलिसांनी अशाप्रकारे लोकांचे पैसे लुटून नेले तर लोकांनी विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्नही कारेमोरे यांनी विचारला.

काय होते प्रकरण?

राजू कारेमोरे यांच्याकडून 31 डिसेंबरला एका व्यापाऱ्याने 50 लाख रुपये नेले. ते व्यापारी तुमसरकडं जात असताना पोलिसांनी त्यांना मोहाडीत अडवले. व्यापाऱ्याला मारहाण करून त्याच्याकडून 50 लाख रुपये लुटल्याची तक्रार व्यापाऱ्याने मोहाडी पोलिसांत केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी राजू कारेमोरे हे मोहाडी पोलिसाकडे गेले होते. त्यांनी पोलिसांना अश्लील शिविगाळ केली होती. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. तर शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार पोलिसांनी व्यापाऱ्याविरोधात केली आहे. पोलीस विरुद्ध आमदार असा हा वाद आहे.

VIDEO: जितेंद्र आव्हाडांचं विधान समाजात तेढ निर्माण करणारं, शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा; बावनकुळेंची मागणी

Video-Accident | सावधान! मुलांजवळ बाईक देताय? 17 वर्षीय विद्यार्थ्याचा भरधाव ट्रकने घेतला बळी, सीसीटीव्हीत थरारक घटना कैद

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें