AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात वाचला.. लिफ्ट उघडताच अवघ्या 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, पहा धक्कादायक व्हिडीओ

गुजरातमधील वलसाड इथल्या सरदार हाइट्समधील साबरमती इमारतीत मोठी लिफ्ट दुर्घटना घडली. या अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इमारतीतल्या एका रहिवाशाचे प्राण या अपघातात थोडक्यात वाचले.

मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात वाचला.. लिफ्ट उघडताच अवघ्या 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं, पहा धक्कादायक व्हिडीओ
गुजरातमधील लिफ्ट अपघातImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 04, 2026 | 9:22 AM
Share

काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. ही म्हण गुजरातच्या वलसाडमधल्या एका रहिवाशासाठी तंतोतंत लागू होते. या म्हणीला शोभावी अशीच एक घटना त्यांच्यासोबत घडली आहे. गुजरातच्या वलसाडमधील अंगावर अक्षरश: काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. सरदार हाइट्सच्या (गुजरात हाऊसिंग बोर्ड संकुल) साबरमती इमारतीत सकाळी सकाळी लिफ्टचा मोठा अपघात झाला. या अपघाताचा अत्यंत भीतीदायक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही त्यावर भीती व्यक्त केली आहे. या फुटेजमध्ये स्पष्ट पहायला मिळतंय की एक व्यक्त लिफ्टमधून बाहेर पडताच लिफ्ट अचानक वेगाने वरच्या दिशेने जाऊ लागते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख वत्सलभाई पांचाळ अशी पटली आहे. ते सरदार हाइट्समधील इमारतीतील रहिवासी आहेत.

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट पहायला मिळतंय की वत्सलभाई पांचाळ हे लिफ्टमधून बाहेर पडतात. ते एक पाऊल बाहेर टाकताच अचानक लिफ्ट वरच्या दिशेने वेगाने जाते. त्यात ते बाहेर फेकले जातात आणि जमिनीवर पडतात. हा व्हिडीओ पाहून स्पष्ट जाणवतं की अवघ्या काही सेकंदांमुळे त्यांचे प्राण वाचले. अन्यथा ते लिफ्ट आणि भिंतीच्या मधे अडकून पडले असते. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत वत्सलभाई हे किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु हे सर्वकाही एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर त्यांचे प्राण सुरक्षित आहेत. परंतु या अपघातानंतर उंच इमारतींमधील लिफ्टच्या सुरक्षिततेबद्दल आणि देखभालीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पहा व्हिडीओ-

सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहायला मिळतंय की सकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी एक व्यक्ती लिफ्टमध्ये प्रवेश करते आणि नंतर लिफ्टचं बटण दाबते. त्यानंतर लिफ्टच्या दाराजवळ उभी राहून ती व्यक्ती वाट बघत असते. 7 वाजून 23 मिनिटांनी जेव्हा ती लिफ्ट थांबते आणि दरवाचा उघडतो, तेव्हा ती व्यक्ती बाहेर पडण्यासाठी एक पाय पुढे टाकते, तितक्यात लिफ्ट खूप वेगाने वरच्या दिशेने जाऊ लागते. त्या व्यक्तीचं डोकं वरच्या मजल्यावर आदळतं, ज्यामुळे तो जमिनीवर पडतो.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..