AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील 60 देशांचे 5000 टन सोने एका भुयारात, एक वीट 12 किलोची; खजिन्याचे फोटो समोर

लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या भूमिगत तिजोरीत 60 पेक्षा अधिक देशांचे 5000 टनांहून अधिक सोने सुरक्षित ठेवलेले आहे. युरोपमधील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची ही सोन्याची तिजोरी आर्थिक सामर्थ्याचे प्रतीक आहे. प्रत्येक वीट 12-13 किलो वजनाची असून, सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी हे ठिकाण महत्त्वाचे ‘गोल्ड हब’ बनले आहे.

जगातील 60 देशांचे 5000 टन सोने एका भुयारात, एक वीट 12 किलोची; खजिन्याचे फोटो समोर
सोन्याची खाणImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 03, 2026 | 7:04 PM
Share

नवी दिल्ली नव्हे तर लंडनमध्ये एक खास जागा आहे. त्या जागेचं अख्ख्या जगाला कुतुहूल आहे. सेंट्रल लंडनमध्ये मेट्रोचा बोगदा सरळ न जाता अचानक वळण घेतो. यामागचं कारण म्हणजे जमिनीखाली पसरलेले बँक ऑफ इंग्लंडचे विशाल तळघर आहे. हा भूमिगत भाग इतका मोठा आहे की त्याला ‘शहराच्या आतलं एक वेगळं शहर’ असंही म्हटलं जातं. असा दावा केला जातो की बँकेच्या एकूण जागेपैकी सुमारे 40 टक्के भाग जमिनीखाली आहे. या भूमिगत भागात युरोपमधील सर्वात मोठी सोन्याची तिजोरी आहे.

लंडनमधील बँक ऑफ इंग्लंडच्या भूमिगत वॉल्टमध्ये जगातील 60 पेक्षा जास्त देशांचे 5000 टनांहून अधिक सोने ठेवलेले आहे. ही तिजोरी युरोपमधील सर्वात मोठी सोन्याची साठवणूक मानली जाते. जगभरात ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्यूयॉर्कची फेडरल रिझर्व्ह बँकची सोन्याची तिजोरी आहे.

प्रत्येक वीटचे वजन 12 ते 13 किलो

या तिजोरीत ठेवलेली प्रत्येक सोन्याची वीट (गोल्ड बार) सुमारे 400 ट्रॉय औंस वजनाची असते. म्हणजेच अंदाजे 12 ते 13 किलो एवढी. एवढं वजन एका वीटेचं असल्यामुळे ती उचलण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. प्रत्येक वीटवर एक वेगळा सिरीयल नंबर किंवा बारकोड कोरलेला असतो. हा नंबर त्या सोन्याची ओळख सांगतो. सोने खरेदी किंवा विक्री होताना बहुतेक वेळा त्या वीटा प्रत्यक्ष हलवल्या जात नाहीत. त्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या असतात, तिथेच राहतात. फक्त नोंदीमध्ये बदल करून त्या वीटचा मालक बदलला जातो. त्यामुळे सुरक्षा कायम राहते आणि व्यवहारही सोपा होतो.

ब्रिटनचे 300 टन सोने

तिजोरीत प्रचंड प्रमाणात सोने साठवलेले असले तरी ते सगळे सोने ब्रिटन देशाचे आहे असे नाही. प्रत्यक्षात या मोठ्या साठ्याचा जास्त भाग इतर देशांचा आहे. बँक ऑफ इंग्लंडकडे स्वतःच्या मालकीचे फक्त दोन सोन्याचे बार प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत. ब्रिटन सरकारचे अंदाजे 300 टन सोने येथे सुरक्षित ठेवलेले आहे. मात्र उर्वरित हजारो टन सोने जगातील 60 हून अधिक देशांच्या केंद्रीय बँकांनी येथे जमा केले आहे. कारण ही तिजोरी अत्यंत सुरक्षित मानली जाते आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठीही सोयीची आहे.

बँक ऑफ इंग्लंडचे भूमिगत वॉल्ट हे फक्त सोने ठेवायची जागा नाही, तर ते जगातील आर्थिक आणि राजकीय ताकदीचे प्रतिक मानले जातात. इथे 5000 टनांहून अधिक सोने साठवलेले आहे आणि 60 पेक्षा जास्त देशांची संपत्ती येथे सुरक्षित ठेवली जाते. बदलत्या जागतिक राजकारणाच्या आणि आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरही लंडन आजही जगातील महत्त्वाचे ‘गोल्ड हब’ म्हणून ओळखले जाते.

ब्रिटनचं 4.27 लाख करोडचं नुकसान

1990 च्या दशकाच्या शेवटी ब्रिटनचे तेव्हाचे अर्थमंत्री गॉर्डन ब्राउन यांनी देशाच्या अर्ध्याहून अधिक सोन्याच्या साठ्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी सोन्याची किंमत सुमारे 275 डॉलर प्रति ग्रॅम होती. आज सोन्याची किंमत जवळपास 5000 डॉलर प्रति ग्रॅमपर्यंत पोहोचली आहे. पडताळून पाहता त्या विक्रीमुळे ब्रिटनला अंदाजे 47 अब्ज डॉलर (सुमारे 4.27 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक) इतका तोटा झाल्याचे मानले जाते. बँक ऑफ इंग्लंड चे सध्याचे गव्हर्नर एंड्र्यू बेले यांच्या मते, त्या काळात सोन्याचा साठा अधिक ‘उपयोगी’ कसा करता येईल यावर चर्चा होती. कारण सोने तिजोरीत ठेवले तर त्यातून थेट उत्पन्न मिळत नाही, असे त्यावेळी मानले जात होते.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन.

विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय?  काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी  म्हणाल्या की...

Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन.

इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांवर बॅलेट गनचा वापर झाल्याचा आरोप, दिल्ली पोलिसांचं खंडन