नशीब म्हणतात ते यालाच, वाघ दिसला नाही म्हणून निराश होऊन मागे फिरले पण तितक्यात.. तो एकटाच नव्हता तर त्याच्यासोबत..VIDEO

जंगल सफारीमध्ये फार कमी जणांच्या वाट्याला थरारक आणि रोमांचक अनुभव येतात. महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जंगल भ्रमंती करताना एका कुटुंबाला असाच आयुष्यभर आठवणीत राहिल असा सुंदर अनुभव आला.

नशीब म्हणतात ते यालाच, वाघ दिसला नाही म्हणून निराश होऊन मागे फिरले पण तितक्यात.. तो एकटाच नव्हता तर त्याच्यासोबत..VIDEO
tadoba tiger reserve
| Updated on: Aug 03, 2026 | 7:48 PM

Tadoba Tigress Chhoti Madhu Spotted : जंगलाचं सौंदर्य आणि रोमांच काही वेगळाच असतो. जंगल सफारीचा अनुभव निसर्गप्रेमींसाठी आयुष्यभरासाठी जपून ठेवण्याची एक सुंदर आठवण असते. जंगल सफारीमध्ये फार कमी जणांच्या वाट्याला थरारक आणि रोमांचक अनुभव येतात. महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात जंगल भ्रमंती करताना एका कुटुंबाला असाच आयुष्यभर आठवणीत राहिल असा सुंदर अनुभव आला. 15 जुलैच्या संध्याकाळची ही घटना आहे. एक कुटुंब गाडीने संध्याकाळच्यावेळी ताडोबा जंगल सफारीसाठी निघालं होतं. पदमापुर गेट मधून आत प्रवेश करताच त्यांना समजलं की, जवळच एक बिबट्या दिसलाय. या कुटुंबाने त्या बिबट्याला पाहण्यासाठी भरपूर प्रयत्न केला. पण तो झुडूपातून बाहेर आलाच नाही.

त्यानंतर नाश्ता करुन ते कुटुंब मोहरलीच्या दिशेने गेलं. भामडेली गावाकडे ते चालले होते. गावाजवळ पोहोचताच एकच गडबड, गलका सुरु झाला. वाघ आला..वाघ आला. लोक शेताच्या दिशेने पळाले. पण वाघ झुडूपाच्या बाहेर आला नाही. अखेर निराश होऊन ते कुटुंब मागे फिरलं. काही प्राणी पाहता यावेत म्हणून ते जंगलाच्या दिशेने चाललेले. एक मोठी संधी हुकल्याची खंत त्यांच्या मनात होती.

त्या कुटुंबाला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता

ते कुटुंब पुन्हा पदमापुरच्या दिशेने चाललेलं. संध्याकाळचे 7:03 झाले होते. अचानक रस्त्याला लागून असलेल्या गवतातून चालत एक वाघिण बाहेर पडली. विशालकाय वाघिणीचं ते ऐटदार चालणं, डोळ्यातली जरब आणि ते रुबाबदार रुप पाहून ते कुटुंब थक्क झालं. त्यांच्या कारपासून काही मीटर अंतरावर ही वाघिण उभी होती. त्या कुटुंबाला डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. अगदी काही क्षणापूर्वी निराश होऊन निघालेल्या त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आश्चर्य, कुतूहलाचे भाव होते. ताडोबाच्या जंगलात ही वाघिण ‘छोटी मधु’ म्हणून लोकप्रिय आहे. वाघिण समोर दिसताच चालकाने लगेच कार मागे घेतली.

बाइकस्वाराला लगेच इशार कळला

महत्वाचं म्हणजे ‘छोटी मधु’ एकटी नव्हती. आधी मधु गवतातून बाहेर आली. नंतर काही सेकंदांनी तिच्या मागोमाग तिची तीन छोटी पिल्लही बाहेर पडली. ती पिल्लं आपल्या आईच्या मागे चालत होती. त्याचवेळी समोरुन एक बाईकस्वार येत होता. कार चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीच्या हेडलाइट्स चालू-बंद करुन त्याला तिथेच थांबण्याचा इशारा केला. बाइकस्वाराला लगेच इशार कळला. त्याने तिथेच थांबून आपले प्राण वाचवले.

‘छोटी मधु’चा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. युजर्स कारचालकाने दाखवलेल्या हुशारीचं कौतुक करत आहेत. वन्यजीवनाचं एक सुंदर रुप या निमित्ताने पहायला मिळालं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us