AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात मायक्रोवेव ठेवताना ही 5 ठिकाणं टाळा, कारण…

घरामध्ये मायक्रोवेव ओव्हन ठेवताना आपण जागेची निवड योग्य केली आहे का, याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीच्या ठिकाणी ठेवलेला मायक्रोवेव केवळ इलेक्ट्रॉनिक बिघाडच नव्हे, तर घरात अपघाताचे कारण बनू शकतो. जाणून घ्या कोणत्या ठिकाणी ठेवणे धोकादायक ठरू शकते.

घरात मायक्रोवेव ठेवताना ही 5 ठिकाणं टाळा, कारण...
फाईल फोटो
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Jul 19, 2025 | 12:53 PM
Share

आजकाल अनेक मिडल क्लास घरांमध्ये मायक्रोवेव्हचा वापर वाढला आहे. अन्न पटकन गरम होणे, काही गोष्टी कमी वेळात तयार होणे यामुळे याचे महत्त्व वाढले आहे. मात्र, मायक्रोवेव्हचा वापर जितका फायदेशीर आहे, तितकाच काळजीपूर्वक तो वापरणे गरजेचे आहे. विशेषतः तो घरात कुठे ठेवायचा याकडे दुर्लक्ष केल्यास ते तुमच्यासाठी मोठा धोका ठरू शकतो. चुकीच्या ठिकाणी मायक्रोवेव्ह ठेवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे.

गॅस स्टोव्हजवळ ठेवण्याची चूक नका करू

खूप जण मायक्रोवेव्ह थेट गॅस चूल्याजवळ ठेवतात. पण ही मोठी चूक आहे. गॅस स्टोव्हमधून निघणारी गरम हवा मायक्रोवेव्हच्या बाहेरील बॉडीला आणि आतल्या सर्किटला इजा पोहोचवते. यामुळे ओव्हरहीटिंग किंवा शॉर्ट सर्किट होण्याचा धोका असतो. शिवाय, इलेक्ट्रॉनिक सिस्टम पूर्णपणे फेल होऊ शकतो.

पाण्याच्या जवळ ठेवू नका मायक्रोवेव्ह

मायक्रोवेव्ह कधीही वॉश बेसिन, सिंक किंवा इतर कोणत्याही पाण्याच्या स्त्रोताजवळ ठेवू नये. मायक्रोवेव्ह हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे आणि पाण्याच्या थेंबांमुळे शॉक लागण्याची किंवा शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. थोडीशी सांडलेली पाणी सुद्धा मशीन खराब करू शकते आणि जीवाला धोका पोहोचू शकतो.

फ्रिज किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणावर ठेवणे धोकादायक

घरात जागेची कमतरता असल्यामुळे अनेक वेळा मायक्रोवेव्ह फ्रिज किंवा इतर उपकरणांच्या वर ठेवला जातो. पण हे अत्यंत चुकीचे आहे. कारण फ्रिजसारख्या उपकरणांमधून वायब्रेशन आणि उष्णता निर्माण होते. याचा परिणाम मायक्रोवेव्हच्या कार्यक्षमतेवर होतो. या दोन्ही उपकरणांचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते.

कॅबिनेटमध्ये ठेवताना व्हेंटिलेशनचे भान ठेवा

अनेकदा घरात सौंदर्यासाठी मायक्रोवेव्ह किचन कॅबिनेटमध्ये बसवला जातो. पण जर त्या जागेत योग्य व्हेंटिलेशन नसेल, तर मायक्रोवेव्ह ओव्हरहीट होतो. मायक्रोवेव्ह वापरताना त्यातून गरम हवा बाहेर पडायला मोकळी जागा असणे आवश्यक आहे. त्यामुळे मायक्रोवेव्हच्या आजूबाजूला किमान 5-6 इंच जागा ठेवावी.

बच्च्यांच्या हातांपासून लांब ठेवा मायक्रोवेव्ह

मायक्रोवेव्ह कधीही अशा ठिकाणी ठेवू नका जिथे लहान मुले सहज पोहोचू शकतात. खेळता खेळता ते मशीन सुरू करू शकतात, ज्यामुळे अपघात किंवा भाजण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तो शक्यतोवर उंचावर किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा.

थोडक्यात सांगायचं झालं तर, मायक्रोवेव्ह घरात असणं फायद्याचं जरूर आहे, पण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी केला गेला पाहिजे. चुकीच्या जागेवर ठेवलेला मायक्रोवेव्ह फक्त तुमच्या स्वयंपाकघराला नाही, तर तुमच्या संपूर्ण घराला धोका ठरू शकतो. त्यामुळे आजच एक नजर टाका तुमचं मायक्रोवेव्ह सुरक्षित जागी आहे का?

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश