AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्यांच्या चुगल्या करून झाली कोट्यावधींची मालकीण, महिलेच्या बिझनेस स्ट्रॅटेजीची तुफान चर्चा!

इतरांच्या घरातील घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. शेजारच्या घरात काय सुरू आहे, कोणाचे कोणाशी पटत नाही किंवा परिसरात कोणती चर्चा सुरू आहे, याची माहिती मिळवण्यासाठी काहीजण नेहमी उत्सुक असतात. मात्र, एका 67 वर्षीय महिलेने याच सवयीला चक्क व्यवसायाचे रूप दिले आहे.

दुसऱ्यांच्या चुगल्या करून झाली कोट्यावधींची मालकीण, महिलेच्या बिझनेस स्ट्रॅटेजीची तुफान चर्चा!
viral trending videoImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 09, 2026 | 6:16 PM
Share

इतरांच्या घरातील घडामोडी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असते. शेजारच्या घरात काय सुरू आहे, कोणाचे कोणाशी पटत नाही किंवा परिसरात कोणती चर्चा सुरू आहे, याची माहिती मिळवण्यासाठी काहीजण नेहमी उत्सुक असतात. मात्र, एका 67 वर्षीय महिलेने याच सवयीला चक्क व्यवसायाचे रूप दिले आहे. त्यांच्या या अनोख्या कामाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या कोलंबियन महिलेने तिच्या या व्यवसायाविषयी सांगताच भारतातील अनेक जणांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

गल्फ टुडेच्या रिपोर्टनुसार, कोलंबियातील आर्मेनिया शहरात राहणाऱ्या मिरियम या महिला दररोज घराबाहेर खुर्ची टाकून बसतात. परिसरात सुरू असलेल्या छोट्या-मोठ्या घडामोडी त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. कोणाच्या घरात काय सुरू आहे, कोणाचे भांडण झाले किंवा कोण कुणाला भेटत आहे, याची माहिती त्या लक्षात ठेवतात. त्यांच्या निरीक्षणामुळे परिसरातील अनेक गुपितांची माहिती त्यांच्याकडे जमा होते.

मिरियम यांनी आपल्या या सवयीला व्यवसायाचे स्वरूप दिले आहे. त्या स्वतःला प्रोफेशनल चिस्मोसा म्हणजेच गॉसिप क्वीन म्हणतात. एखाद्या शेजाऱ्याबद्दल माहिती हवी असल्यास लोक त्यांच्याकडे येतात. छोट्या बातमीसाठी त्या 5,000 ते 10,000 कोलंबियन पेसो आकारतात, तर मोठ्या गुपिताची किंमत अधिक असते. त्यामुळे साध्या गॉसिपमधूनही त्यांना चांगली कमाई होते.

मिरियम यांनी सांगितले की, एका व्यक्तीचे पत्नी बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे गुपित त्यांनी जपले होते. हे गुपित लपवण्यासाठी त्या व्यक्तीकडून त्यांनी 7 लाख कोलंबियन रूपये घेतले होते. या प्रकारातून त्यांच्या व्यवसायाची अनोखी पद्धत समोर येते.

मिरियम प्रत्येक माहितीची तारीख आणि वेळेसह नोटबुकमध्ये नोंद करतात. त्यांच्या घरात गॉसिप बोर्डही आहे, ज्यावर फोटो, कागद आणि धाग्यांच्या मदतीने माहिती जोडलेली असते. त्यांच्या या कामामुळे काही शेजारी नाराज असले तरी परिसरातील लोकांची उत्सुकता त्यांना पुन्हा मिरियम यांच्या दारापर्यंत घेऊन येते. अशा प्रकारे केवळ निरीक्षण आणि गॉसिपच्या माध्यमातून मिरियम यांनी आपले वेगळे उत्पन्नाचे साधन तयार केले आहे.

Follow Us
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब