AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हाला जमेल का ‘असं’ करायला? माकडाचा ‘हा’ Funny video viral

Animal cute video : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांशी संबंधित सुंदर क्षण असलेले व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. सध्या माकडांशी (Monkey) संबंधित एक मजेदार (Funny) व्हिडिओ समोर आला आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की प्रत्यक्षात हे आमचे पूर्वज असतील.

तुम्हाला जमेल का 'असं' करायला? माकडाचा 'हा' Funny video viral
मुलाप्रमाणेच बॅकफ्लिप मारताना माकडImage Credit source: Twitter
| Updated on: Mar 16, 2022 | 1:50 PM
Share

Animal cute video : सोशल मीडियावर (Social media) प्राण्यांशी संबंधित सुंदर क्षण असलेले व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. प्राणीप्रेमींना हे व्हिडिओ मोठ्या आवडीने बघायला आवडतात. एवढेच नाही तर इंटरनेटवर असा व्हिडिओ अपलोड झाला की लगेच ते मोबाइलमध्ये सेव्ह करतात. सध्या माकडांशी (Monkey) संबंधित एक मजेदार (Funny) व्हिडिओ समोर आला आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, की प्रत्यक्षात माकड हे आमचे पूर्वज असतील. कारण त्यांची कृती माणसांसारखीच असते. माकडे त्यांच्या वात्रटपणासाठी ओळखली जातात. धूर्तपणा आणि उडी मारण्यात त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, मुलगा बॅकफ्लिप करताच, त्याची नक्कल करत माकडही बॅकफ्लिप करायला लागतो. या व्हिडिओला यूझर्सकडून खूप पसंती मिळत आहे. हे पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच हसू येईल.

पार्कमध्ये शूट

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ एका पार्कमध्ये शूट करण्यात आला आहे. जिथे एक मुलगा माकडाच्या दिशेने कॅमेरा दाखवल्यानंतर बॅकफ्लिप करतो. गंमत म्हणजे त्या मुलाची नक्कल करताना माकडही त्याच पद्धतीने बॅकफ्लिप मारायला सुरुवात करते. 9 सेकंदाच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

ट्विटरवर शेअर

माकडाचा हा मजेशीर व्हिडिओ मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर Fred Schultz नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरने कॅप्शनमध्ये लिहिले, तुम्ही असे करू शकता का? दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 24 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर पोस्टला 9 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूझर्स वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

‘काँटे की टक्कर’

एका यूझरने कमेंट करताना लिहिले, की मी हे सकाळीच पाहिले आहे. हे खरोखर मजेदार आहे. त्यामुळे माझा दिवस चांगला जाणार. आणखी एका यूझरचे म्हणणे आहे, की या माकडाने मुलाला काँटे की टक्कर दिली. त्याचप्रमाणे आणखी एका यूझरने कमेंट करताना लिहिले आहे, की मला समजत नाही की कोण कोणाला ट्रेनिंग देत आहे. एकूणच, हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे आणि ते खूप एन्जॉय करत आहेत.

आणखी वाचा :

GoogleMapsच्या आधी ‘असे’ शोधले जायचे रस्ते, Funny video पाहून म्हणाल, क्या टायमिंग है!

Video : मगरही होते कुणाचीतरी शिकार! पाहा ‘या’ दोन प्राण्यांमधला जीवन-मरणाचा सामना

…म्हणून म्हणतात आगीशी कधीही खेळू नये, ‘या’ माणसाची कशी अवस्था झाली? पाहा ‘हा’ Viral video

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...