…म्हणून म्हणतात आगीशी कधीही खेळू नये, ‘या’ माणसाची कशी अवस्था झाली? पाहा ‘हा’ Viral video

...म्हणून म्हणतात आगीशी कधीही खेळू नये, 'या' माणसाची कशी अवस्था झाली? पाहा 'हा' Viral video
थट्टामस्करीत हा व्यक्ती स्वत:च्याच पाठीला लावतो आग
Image Credit source: Twitter

Funny video : एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती थट्टा मस्करी करत त्याच्या पाठीला आग (Fire) लावते आणि नंतर त्याची किंमत मोजावी लागते. हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे.

प्रदीप गरड

|

Mar 16, 2022 | 1:39 PM

Funny video : जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन करायचे आहे आणि ते करतातही. परंतु ज्यात जीव धोक्यात येईल, असे काहीही करू नका. तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील, जे स्टंट करण्याच्या नादात उंच टेकडीवरून उडी मारतात, तर काही लोक आणखी काही धोकादायक स्टंट करून आपला जीव धोक्यात घालतात. काही लोक विनोदाने असे काही करतात, जे त्यांच्यासाठीच धोकादायक (Dangerous) ठरते. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) खूप व्हायरल (Viral) होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती थट्टा मस्करी करत त्याच्या पाठीला आग (Fire) लावते आणि नंतर त्याची किंमत मोजावी लागते. हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे, जो पाहून कोणालाही हसू येईल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक माणूस लायटर कसा पेटवतो आणि त्याच्या पाठीवर आग लावतो.

सुदैवाने वाचला

या माणसाला वाटते, की ही आग फक्त आपल्या कपड्यांनाच लागेल, पण लवकरच आगीचे चटके त्याच्या पाठीवरही दिसू लागतात. त्यानंतर तो पटकन त्याच्या टी-शर्टचे बटण काढतो आणि बाथरूमच्या दिशेने धावतो, जेणेकरून आग विझवता येईल पाणी घालून. म्हणूनच आगीशी कधीही खेळू नये, असे म्हणतात. आता गंमत म्हणून त्या व्यक्तीची पाठ भाजली. त्याच्यासोबतही मोठा अपघात घडू शकला असता, पण सुदैवाने त्याने ताबडतोब स्वत:ला सावरले आणि पुढे विझवण्यासाठी बाथरूमच्या दिशेने धाव घेतली.

ट्विटरवर शेअर

हा मजेदार व्हिडिओ @ViciousVideos नावाच्या आयडीसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 18 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 8 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर शेकडो लोकांनी या व्हिडिओला लाइकही केले आहे. सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा :

Viral : 11 वर्षाच्या मुलानं परदेशात खरेदी केली जमीन, कारण जाणून आश्चर्यचकित व्हाल; वाचा सविस्तर

Photo : ‘…तर मला विमानातून फेकून द्या’, वडा पावच्या फोटोची ‘ही’ पोस्ट होतेय Viral

Presence of mind असावा तर ‘असा’; पाण्यातून असा रस्ता काढला, की लोक म्हणतायत, मुंबईकरांसाठी ‘ही’ भारी आयडिया | Video पाहा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें