Video : ‘जोर का झटका जोरों से लगा’; विचार करून स्टंट करा, नाहीतर ‘असं’ तोंडावर आपटावं लागतं!

Video : 'जोर का झटका जोरों से लगा'; विचार करून स्टंट करा, नाहीतर 'असं' तोंडावर आपटावं लागतं!
स्टंट करताना तोंडावर आपटला तरुण

एखादा स्टंट (Stunt) त्यात तुम्ही पारंगत नसताना केल्यास पडल्यावर काय होतं? सहाजिकच दुखापत होते. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होतोय, ज्यामध्ये एक मुलगा सायकलवर स्टंट करताना जखमी झाला आहे.

प्रदीप गरड

|

Jan 24, 2022 | 3:03 PM

Funny Stunt Fails Videos : विचार न करता कोणतंही काम करू नका, ते महागात पडू शकतं. तुमचं नुकसान होऊ शकतं. विशेषत: स्टंट (Stunt) दाखवताना स्टंटमॅन आधी अनेक वेळा त्याचा सराव करतात आणि नंतर स्टंट करतो ज्यामुळे शरीराला कोणतीही हानी होणार नाही. तुम्ही तुमच्या लहानपणी खूप सायकल चालवली असेल आणि पाण्यानं भरलेले खड्डेही खूप वेगाने पार केले असतील. अनेकवेळा तुम्ही सायकलवरून पडलाही असाल. सायकल चालवताना पडणं हे स्वाभाविक आहे. पण एखादा स्टंट (Stunt) त्यात तुम्ही पारंगत नसताना केल्यास पडल्यावर काय होतं? सहाजिकच दुखापत होते. असाच एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल (Viral) होतोय, ज्यामध्ये एक मुलगा सायकलवर स्टंट करताना जखमी झाला आहे.

तोल गेला आणि तो सायकलसह पडला

एका ठिकाणी रस्ता चांगला नसून तिथं पाणी वाहत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ते पाहिल्यावर तिथं खड्डा असेल असं वाटत नाही, परंतु प्रत्यक्षात तिथं मोठे खड्डे पडले आहेत. यादरम्यान एक मुलगा वेगानं सायकल चालवत तिथं येतो आणि त्याच वेगानं खड्डा ओलांडण्याचा प्रयत्न करतो, पण कदाचित त्याला तिथं खड्डा आहे, हे माहीत नसेल. त्याची सायकल खड्ड्यात पडताच त्याचा तोल गेला आणि तो सायकलसह पडला. तो ज्या प्रकारे पडला, त्यामुळे त्याला खूप दुखापत झाली असावी, असं वाटतं.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर zameer0603 या आयडीनं शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 4 दशलक्षाहून अधिक म्हणजेच 40 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केलं आहे.

‘डूब ही गया आखिर’

अनेकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर विविध मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूझरनं ‘डूब ही गया आखिर’ असं लिहिलं आहे, तर दुसऱ्या यूझरनं ‘जोर का झटका जोरों से लगा है’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें