Video | तरुणींसमोर स्टंट करण्याची हौस, स्टंटबाज तरुणाचा अपघात, व्हिडीओ व्हायरल

सध्यातर एक अतिशय मजेदार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.

Video | तरुणींसमोर स्टंट करण्याची हौस, स्टंटबाज तरुणाचा अपघात, व्हिडीओ व्हायरल
VIRAL STUNT VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. या मंचावर कधीकधी तर पोट धरून हसायला लावणाऱ्या व्हिडीओंची चर्चा होते. तर काही व्हिडीओंना पाहून तर आपण थक्क होऊन जातो. आजकाल तरुणांनी वेगवेगळे थरारक स्टंट केलेले व्हिडीओ लोक आवडीने पाहतात. सध्यातर एक अतिशय मजेदार असा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाची चांगलीच फजिती झाली आहे.

तरुणींसमोर स्टंट करण्याचा प्रयत्न

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्टंटबाजी करताना दिसतोय. तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी त्याने हा घाट घातला आहे. मात्र नको ती करामत केल्यामुळे त्याचा चांगलाच अपघात झालाय. या अपघातामध्ये तो तसेच त्याच्यासोबत असलेल्या तरुणी जमखी झाल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलेले नाही.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हायरल होत असलेला व्हिडीओ अतिशय मजेदार आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण स्पोर्ट बाईकवर बसलेला दिसतोय. तो गाडीचा जोरजोरात आवाज करतोय. थोड्या वेळाने त्याच्याजवळ दोन तरुणी आलेल्या आहेत. आपल्याकडे तरुणी आल्याचे समजताच तो चांगलाच भारावलाय. त्याच्या दुचाकीवर दोन तरुणी बसल्या आहेत. विशेष म्हणजे यातील एक तरुणी त्याच्याकडे तोंड करुन बसली आहे. तर दुसऱ्या तरुणीने स्टंटबाज तरुणाला मागून पकडले आहे. नंतर गाडी जोरात चालवत तो स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र दुचाकीवर जास्त वाजन जाल्यामुळे तसेच तोल गेल्यामुळे व्हिडीओतील तरुण रस्त्यावर आदळलाय.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

व्हायरल होत असलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तो चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी स्टंटबाज तरूणावर टीका करत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर हा व्हिडीओ उत्स्फूर्तपणे शेअर करत अशा प्रकारचे स्टंट न करण्याचे लोकांना आवाहन केले आहे. The Darwin Awards या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पाहता येईल.

इतर बातम्या :

Video: बॉलसारखा गोल, 4 पाय आणि विचित्र चेहरा, या समुद्री प्राण्याला तुम्ही ओळखता का?

Video: शेकडो किलोचं पोतं एका झटक्यात फेकलं, लोक म्हणाले, बोला बजरंगाची कमाल, हमाल, दे धमाल!

Video: जेवण घशात अडकलं, श्वास गुदमरला, आणि त्याचा जीव जाणार तितक्यात…पाहा व्हिडीओ!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI