AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: जेवण घशात अडकलं, श्वास गुदमरला, आणि त्याचा जीव जाणार तितक्यात…पाहा व्हिडीओ!

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवताना बसलेल्या व्यक्तीच्या घशात काहीतरी अडकल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे व्यक्ती अस्वस्थ होते.

Video: जेवण घशात अडकलं, श्वास गुदमरला, आणि त्याचा जीव जाणार तितक्यात...पाहा व्हिडीओ!
घशात जेवण अडकल्यावर काय होतं पाहा!
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 1:56 PM
Share

बऱ्याचदा जेवताना एखादा तुकडा घशात अडकतो, तेव्हा माणूस प्रचंड अस्वस्थ होतो. श्वास घेणे कठीण होते. आणि काही प्रसंगी लोक दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही देखील जाणून घेऊ शकता की अचानक घशात अन्न अडकल्यास काय होऊ शकतं. हे प्रकरण ब्राझीलमधील साओ पॉला या भागातील आहे. रेस्टॉरंटमध्ये आलेल्या 38 वर्षीय ग्राहकाच्या घशात जेवण अडकतं आणि काही क्षणातच तो बेशुद्ध पडू लागतो. यानंतर जे काही घडते ते चमत्कारापेक्षा कमी नाही. (horrible video of waiter and officers saved a man after he chokes on food at restaurant in Brazil Viral video)

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेस्टॉरंटमध्ये जेवताना बसलेल्या व्यक्तीच्या घशात काहीतरी अडकल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे व्यक्ती अस्वस्थ होते. तेवढ्यात या व्यक्तीच्या मागे बसलेली महिलेला काहीतरी जाणवतं, आणि ती उठून पुढे त्या माणसाला बघायला येते. त्याच दरम्यान इतरही काही लोक तिथं जातात. प्रत्येकजण त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण, ग्राहक प्रतिसाद देत नाही. यानंतर लोक वेटरला फोन करतात. मग वेटर काय करतो हे, पाहिल्यानंतर तुम्हीही त्याचे कौतुक करताना थकल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वेटर त्या व्यक्तीला मागून पकडतो आणि त्याला जोरात उचलून जोरात दाबतो. मग एक पोलीस अधिकारी तिथं येतो आणि तीच प्रक्रिया त्या व्यक्तीसोबत वेगाने करू लागतो. त्यानंतर व्यक्तीच्या घशात अडकलेले अन्न खाली जाते आणि तो पुन्हा श्वास घेऊ लागतो. अशा प्रकारे वेटर आणि पोलीस दोघे मिळून या व्यक्तीचे प्राण वाचवतात.

व्हिडीओ पाहा:

गुडन्यूज कॉरस्पॉन्डंट नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एक दिवसापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 900 हून अधिक लोकांनी ते लाइक केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सतत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, देवाचे आभार मानतो की शेवटच्या क्षणी वेटरने या व्यक्तीचे प्राण वाचवले. अशा लोकांना माझा सलाम. त्याचवेळी आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे की, वेटरचे कौतुक करावे तेवढे कमी आहे, पण मला वाटते की पोलीस कर्मचाऱ्याने त्याचा जीव वाचवण्यात मदत केली आहे. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, असे लोकच खऱ्या आयुष्यातील खरे हिरो असतात.

हेही पाहा:

Video: बॉलसारखा गोल, 4 पाय आणि विचित्र चेहरा, या समुद्री प्राण्याला तुम्ही ओळखता का?

Video: मित्राच्या सायकलमागे स्टंट करण्याचा प्रयत्न अंगाशी, तोल गेला, तोंड फुटलं, पाहा व्हिडीओ!

 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.