AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बघताच एलियन वाटतो… हात लावताच करंट मारतो… या अजीब किड्याने सर्वांनाच केलं हैराण

फोबेट्रॉन पिथेसियम (हॅग मॉथ) हा एलियनसारखा दिसणारा एक अनोखा कीटक आहे, ज्याला 'मंकी स्लग कॅटरपिलर' असेही म्हणतात. त्याचा स्पर्श धोकादायक असून, त्यामुळे मधमाशीच्या डंखाप्रमाणे तीव्र वेदना होऊ शकतात. ही अळी मोठी झाल्यावर साध्या पतंगात रूपांतरित होते. त्याच्या विचित्र रूपावर भाळून त्याला चुकूनही स्पर्श करू नका.

बघताच एलियन वाटतो... हात लावताच करंट मारतो... या अजीब किड्याने सर्वांनाच केलं हैराण
| Updated on: Oct 15, 2026 | 4:23 PM
Share

निसर्गात एकाहून एक असे अजब आणि अनोखे जीव आहेत. काही त्यांच्या सौंदर्याने मन मोहून घेतात, पण काही एवढे भीतिदायक असतात की त्यांच्याजवळ जाण्याचीही हिंमत होत नाही. आजा आपण अशाच एका जीवाबद्दल, विचित्र किड्याबद्दल जाणून घेणार आहोत, पहिल्यांद पाहताच तो एखाद्या एलियनसारखा किंवा स्टारफिश सारखा दिसतो. पण त्याला हात लावायला गेलात, तर त खूपच महागात पडू शकतं. जाणून घेऊया या अजीबोगरीब किड्याबद्दल..

कोणता आहे हा कीडा ?

या अनोख्या जीवाचे वैज्ञानिक नाव फोबेट्रॉन पिथेसियम (Phobetron pithecium) असं आहे. सामान्यतः याला हॅग मॉथ (Hag Moth) किंवा मंकी स्लग कॅटरपिलर (Monkey Slug Caterpillar) असं म्हणतात. याची अळी एखाद्या कापलेल्या स्टारफिश सारखी किंवा स्लगसारखी दिसते. शरीरातून बाहेर आलेले विचित्र अवयवांमुळे हा जणू दुसऱ्या ग्रहावरील जीवासारखा दिसतो. हा प्रामुख्याने उत्तर अमेरिकेतील जंगले आणि बागांमध्ये आढळतो.

स्पर्श केल्यावर बसतो वीजेचा झटका ?

दिसायला अतिशय विचित्र असलेल्या या अळीच्या शरीरावरील बाहेर आलेल्या भागांखाली लहान, पोकळ काटे लपलेले असतात. एखाद्या माणसाने किंवा शिकारी प्राण्याने त्याला स्पर्श केल्यास हे काटे त्वचेत रुतून विषारी पदार्थ सोडू शकतात. त्यामुळे मधमाशीने डंख मारल्यासारखी किंवा विजेचा सौम्य झटका बसल्यासारखी वेदना होते तसेच तीव्र जळजळ आणि सूज जाणवू शकते.

कमाल आहे संरक्षण यंत्रणा !

या कीटकाच्या शरीराची विचित्र रचना केवळ शत्रूला घाबरवण्यासाठी नसते, तर ती त्याच्या संरक्षणासाठीही उपयुक्त ठरते. शिकाऱ्याने हल्ला केल्यास शरीराचे स्टारफिशसारखे काही भाग सहज तुटून वेगळे होऊ शकतात. यामुळे शिकाऱ्याचे लक्ष विचलित होऊन अळीला स्वतःचा जीव वाचवण्याची संधी मिळते.

दिसायला एखाद्या परग्रहावरील जीवासारखी वाटणारी ही अळी मोठी झाल्यावर तीचं साधारण तपकिरी रंगाच्या पतंगात रूपांतर होतं. त्याचं प्रौढ रूप पाहिलं तर, त्याचं सुरूवातीचं रुप किंवा अवस्था याची कल्पनाही करता येणार नाही. त्यामुळे झाडाझुडपांजवळ असा विचित्र, एलियनसारखा कीटक दिसल्यास त्याला हात लावण्याऐवजी सुरक्षित अंतरावरूनच त्याचा फोटोत्र काढा. चुकूनही त्याला हाचत लावण्यची किंवा स्पर्श करण्याची चूक करू नका !

Follow Us
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?