Elon Musk: सर्वात मोठ्या Youtuber ने विचारले – मी Twitter चा CEO होऊ का? मस्कने दिले मजेशीर उत्तर

44 अब्ज डॉलरला ट्विटर खरेदी केल्यानंतर मस्क यांनी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

Elon Musk: सर्वात मोठ्या Youtuber ने विचारले - मी Twitter चा CEO होऊ का? मस्कने दिले मजेशीर उत्तर
Mr Beast
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 23, 2022 | 5:25 PM

अलीकडेच, एलन मस्क यांनी ट्विटरवर एका सर्वेक्षणाद्वारे लोकांना विचारले की त्यांनी ट्विटरचे प्रमुखपद सोडावे का? निकाल अनुकूल न लागल्यानंतर, मस्कने जाहीर केले की तो एका चांगल्या सीईओच्या शोधात आहे. आता जगातील सर्वात प्रसिद्ध YouTuber ‘मिस्टर बीस्ट’ डोनाल्डसनने या पोस्टमध्ये आपली स्वारस्य दर्शविल आणि विचारले – तो ट्विटरचा नवीन सीईओ होऊ शकतो का? यावर मस्क यांनीही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

गुरुवारी रात्री मिस्टर बीस्टने ट्विट केले की, “मी ट्विटरचा नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी बनू शकतो का?” कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या प्रतिक्रियांचा भडीमार झाला. त्याचवेळी मस्क उत्तर देण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. “हा प्रश्नच उद्भवत नाही,” त्याने 24 वर्षीय यूट्यूबरला म्हटले.

बहुतेक वापरकर्ते मस्क यांच्या आवाजात सामील झाले आणि मिस्टर बीस्टची मुख्य कार्यकारी अधिकारी बनण्याची इच्छा नाकारली.

ट्विटरवर मोठ्या प्रमाणात बंदी घातलेली खाती परत आल्याने मस्क यांचे नेतृत्व वादाच्या भोवऱ्यात सापडले. मस्क यांनी ट्विट केले की, “प्रश्न केवळ नवीन सीईओ शोधण्यापुरता नाही. प्रश्न ट्विटरला जिवंत ठेवू शकेल असा सीईओ शोधण्याचा आहे.”

44 अब्ज डॉलरला ट्विटर खरेदी केल्यानंतर मस्क यांनी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर त्यांनी स्वत:च त्याचा ताबा घेतला.

यानंतरच त्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. 12 तास काम करू इच्छिणाऱ्यांचे स्वागत आहे, असे फर्मान काढले.

सध्या मस्क टेस्ला इंक, स्पेसएक्स, द बोरिंग कंपनी, न्यूरालिंक आणि मस्क फाउंडेशनचे सीईओ आहेत. इतर कंपन्यांकडे दुर्लक्ष करत असल्याची टीकाही त्यांच्यावर झाली.