VIDEO : मुंबईत बाथरुम सारख्या घरात राहतात पाच लोक, भाडं 6000 रुपये

मुंबई मायानगरी सर्वांचे स्वप्न पूर्ण करते. पण हिच स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांना छोट्याश्या जागेत आपला संसार मांडावा लागतो. प्रचंड अजेस्ट करावं लागतं. मुंबईच्या चाळीतील छोट्या घराची झलक दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIDEO : मुंबईत बाथरुम सारख्या घरात राहतात पाच लोक, भाडं 6000 रुपये
mumbai small homes
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 11, 2026 | 12:04 PM

मुंबई म्हणजेच स्वप्नांची नगरी, मुंबई मायानगरी, मुंबई म्हणजे सगळ्यांना आपलंस करणारी, मुंबई म्हणजे प्रत्येकाला स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवणारी. या शहरात स्वप्न पूर्ण करण्यासाठी तितकी कसरतंही करावी लागते. सुरूवात होते ती इथल्या गल्ली बोळातील घरापासून. छोट्या छोट्या खोल्यांमध्ये मोठं कुटुंब राहतं. विशेष म्हणजे या खोल्यांच भाडंही चर्चेचा विषय आहे. असाच एका कुटुंबाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ यात्रा गुरूजी029 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला. व्हिडिओमध्ये एक कंटेट क्रिएटर मुंबईतील एका लहानशा घरात जातो. ही खोली इतकी लहान आहे की एखाद्या बाथरूम इतकीच तिची जागा आहे. या घरात 5 जण राहत असल्याचं घरमालकाने सांगितलं. घर इतकं लहान आहे की पाय पसरायला देखील पुरेशी जागा नाही. बाथरूम इतक्या वाटणाऱ्या या खोलीत एका बाजूला छोटं किचन आहे. भिंतींवरील कप्प्यांमध्ये स्वयंपाकाची भांडी ठेवलेली आहेत. तर दुसऱ्या बाजूला अंघोळ करण्यासाठी एकदम बारीकीशी जागा आहे. तसेच मुलांना अभ्यास करण्यासाठी देखील जागा करण्यात आली आहे.

Loading...


या घरात राहणार्‍या या व्यक्तीने सांगितलं की, सकाळी पाणी आलं की पत्नीला पाणी भरायचं असतं आणि भांडीही धुवायची असतात. त्यामुळे तो स्वत: दुसऱ्या बाजूला सरकतो. मुलांना सकाळी शाळेत लवकर जायचं असल्यामुळे ते दरवाज्याच्या बाजूला झोपतात. जेणेकरून त्यांना उठताना वडिलांच्या झोपेचा त्रास होऊ नये.

या व्यक्तीने सांगितलेली आणखी एक गोष्ट मनाला चटका लावणारी आहे. खोलीत झोपताना त्याला पु्र्ण पसरून झोपतानाही येत नाही. पाय दुखू लागले की दोन्ही पाय भिंतीला टेकवून ठेवावे लागतात. व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटरनेही या जागेत झोपून पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यालाही पाय दुमडूनच झोपावं लागलं.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मुंबईतील घरांच्या वाढत्या भाड्यांवर आणि सर्वसामान्यांच्या राहणीमानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी अशा परिस्थितीत गावाकडेचं आयुष्यबरं,अशी प्रतिक्रिया दिली. तर काहींनी मुंबईत येण्याआधी राहण्याच्या खर्चाचा विचार करण्याचा सल्ला दिला. खरंच मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. काहींसाठी ही स्वप्नांची नगरी असते. तर काहींसाठी एवढ्याशा जागेत संसार सांभाळण्याची रोजची धडपड

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us