मुलीने ऑनलाइन ऑर्डर केले सॅनिटरी पॅड, पॅकेट खोलताच झाली हैराण!
संपूर्ण प्रकार ट्विटरवर शेअर केला आहे. समीराच्या म्हणण्यानुसार, तिने स्विगी इन्स्टामार्टकडून ऑनलाइन सॅनिटरी पॅडची ऑर्डर दिली होती.

आजकाल लोकांची शॉपिंग स्टाईल बदलत चालली आहे. वेळेअभावी लोक आता ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याला अधिक प्राधान्य देत आहेत. मात्र, हे करत असताना पैसे देऊनही त्यांनी ऑर्डर केलेलीच वस्तू मिळेल, अशी भीतीही त्यांना वाटते. अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मुलीने सॅनिटरी पॅड ऑर्डर करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर दिली होती. पण डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा तिने पॅकेट उघडलं तेव्हा त्यातून काय बाहेर आलं ते पाहून ती आश्चर्यचकित झाली.
रिपोर्टनुसार, समीरा नावाच्या मुलीने संपूर्ण प्रकार ट्विटरवर शेअर केला आहे. समीराच्या म्हणण्यानुसार, तिने स्विगी इन्स्टामार्टकडून ऑनलाइन सॅनिटरी पॅडची ऑर्डर दिली होती.
काही वेळाने स्विगीचा डिलिव्हरी बॉय त्याचे पॅकेट घेऊन घरी पोहोचला. डिलिव्हरी बॉय गेल्यानंतर जेव्हा तिने पॅकेट उघडलं तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. बॅगेत सॅनिटरी पॅडखाली चॉकलेट, अनेक बिस्किटे ठेवण्यात आली होती. समीराच्या म्हणण्यानुसार, हे कोणी केले स्विगी असो वा दुकानदार, पण त्यामुळे त्याला बरं वाटलं.
समीराने ही घटना ट्विटरवर शेअर करताच लोकांनी तिच्यावर कमेंट करण्यास सुरुवात केली. एका युजरने सांगितले की, डिलिव्हरी बॉयच्या चुकीमुळे हे होऊ शकते. आणखी एका युजरने असे करून कंपनीने चांगले काम केल्याचे म्हटले आहे. हे ट्विट व्हायरल होताना पाहून स्विगीनेही प्रत्युत्तर दिले. स्विगीने लिहिलं आहे की, “तुमचा दिवस चांगला जावा अशी आमची इच्छा आहे.”
ऑनलाईन वस्तू पाठवणाऱ्या कंपन्यांच्या डिलिव्हरीमध्ये अनेकदा फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत. आगाऊ पैसे देऊनही पाकिटे उघडताना लोकांकडून विटा, दगड, माती किंवा इतर निरुपयोगी वस्तू बाहेर येत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे ऑनलाइन डिलिव्हरी सिस्टीमवरील लोकांचा विश्वास काहीसा डळमळीत झाला असला तरी वेळेअभावी ते याला प्राधान्य देत आहेत.