Video : पाकिस्तानी मुस्कानला भारतीय सण – संस्कृतीची भुरळ ; पासपोर्ट मिळताच गंगा आरती आणि ऋषिकेशला भेट देण्याचं स्वप्न
पाकिस्तानी मुस्कानला अनेक देश फिरले पण तिला आयुष्यात एकदा तरी भारत फिरण्याची इच्छा आहे. भारतीय सण - संस्कृतींनी तिच्या मनाला भूरळ घातली आहे. वाराणसीची गंगा आरती आणि ऋषिकेशला भेट देण्याचं स्वप्न आहे.

परदेशात अनेक देश फिरून झाले, वेगवेगळ्या संस्कृती पाहिल्या,पण तरीही एका देशाला भेट देण्याची पाकिस्तानी मुस्कानची दिलेर इच्छा आहे. विशेष म्हणजे तिला भारत फिरायचा आहे आणि कोणत्या ठिकाणी फिरायचंय याची यादी तिने सोशल मीडियावर जाहीर केली आहे. त्यात वाराणसीची गंगा आरती. ताजमहालातील सूर्योदय आणि राजस्थानच्या वाळवंटात तिला रात्र घालवायचे स्वप्ने आहेत. ही इच्छा तिने सोशल मीडिायावर बोलून दाखवली आहे. ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे
मुस्कन ही ट्र्रॅव्हल व्लॉगर असून इन्स्टाग्रामवर ती व्हिडिओ शेअर करत असते. आतापर्यंत तिने जगातील 20 हून अधिक देशांचा प्रवास केला आहे. सध्या ती जर्मनीत राहते. मुस्कानने सोशल मीडियावर भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली ति म्हणाली कि, ती पाकिस्तानी आहे तरी तिचं मन दिल्लीत रमलं आहे. ज्या दिवशी तिला जर्मन पासपोर्ट मिळेल, त्या दिवशी भारत हा तिच्या प्रवासातील पहिला देश असेल, असं ती म्हणाली.
मुस्कानच्या भारत भेटीच्या यादीत सर्वात खास आहे ती वाराणसीची गंगा आरती.गंगेच्या नदीपात्रात बसून संध्याकाळची आरती पाहण्याची तिची इच्छा आहे. याशिवाय दिल्लीतील कमळ मंदिराला भेट द्यायची आहे. सुर्योदयाच्या वेळी ताजमहाल पाहण्याचंही तिचं स्वप्न आहे.
इतकंच नाही, तर तिला ऋषिकेशमध्ये गंगेच्या काठावर सूर्योदयाच्या वेळी योगाभ्यास करायचा आहे. भारतात आल्यावर होळी खेळण्याचीही मुस्कानचीही इच्छा आहे. तर राजस्थानमध्येही तिला काही दिवस घालवायचे आहे. तिच्या यादीत पर्यटनांसोबतच भारतीय संस्कृती, सणांचा अनुभव घेण्याची इच्छा आहे.
मुस्कानने सांगितलं की, यातील काही ठिकाणं तिला लहानपणी बॉलिवूड चित्रपट पाहतानाच आवडली होती. तिचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही भारतीय नेटकऱ्यांनी तिच्या यादीत स्पिती व्हॅली, लडाख, केरळ यांसारख्या ठिकाणीही जा असा सल्लाही
दिला.