AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पीएम मोदी यांनी झालमुरीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज

PM Modi Jhalmuri Video: पश्चिम बंगालमध्ये आपल्या व्यस्त प्रचार दौऱ्यात वेळ काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील लोकल स्ट्रीट फूड 'झालमुरी'चा आस्वाद घेतल्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. झाडग्राम येथील आपल्या निवडणूक प्रचारा दौऱ्या दरम्यान ते एका दुकानात थांबले आणि त्यांनी झालमुरीची स्वाद घेतला.हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर १० कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

पीएम मोदी यांनी झालमुरीचा घेतला आस्वाद, व्हिडीओ तुफान व्हायरल, २४ तासात १०० मिलियनहून जास्त व्ह्यूज
pm modi viral video
| Updated on: Apr 20, 2026 | 9:29 PM
Share

PM Modi Jhalmuri Video Viral: पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणूक प्रचारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताफा थांबवून रस्त्यावरील ठेल्यावर झालमुडीचा स्वाद घेतल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ही घटना पीएम मोदी यांच्या झारग्राममध्ये एका पब्लिक रॅलीत संबोधित केल्यानंतर काही वेळानंतर घडली. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरमध्ये सवार होण्यासाठी जात होते. तेव्हा अचानक त्यांनी वळून रस्त्याकडील दुकानात झालमुडीचा ( भेळीचा प्रकार ) आस्वाद घेतला. हा व्हिडीओ पीएम मोदी यांच्या ऑफिशियल इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला गेला. इंस्टाग्रामवरुन वेगाने व्हायरल झालेल्या या व्हिडीओला २४ तासाच्या आत १०० मिलियन ( १० कोटी ) व्ह्यूज मिळाले. तर फेसबुकवर पोस्ट केलेल्या व्हिडीओला ९१ मिलियन ( सुमारे ९.१ कोटी ) व्यूज मिळाले.

पीएम मोदी यांनी दुकानदाराशी साधला संवाद

वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत पीएम मोदी दुकानदाराच्या जवळ जातात आणि त्याला म्हणतात मला झालमुडी खायला देशील? मोदी दुकानदाराला विचारात किती रुपयांना तुमची झालमुडी आहे. यानंतर मोदी पुढचा प्रश्न विचारतात चांगला वाला कितीला आहे ?

या प्रश्नाचे उत्तर देताना दुकानदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगतो की १० रुपये, २० रुपये आणि ३० रुपये. दुकानदार पीएम मोदींना विचारतात तुम्ही कांदा खाता का ? या प्रश्नावर मोदी मिश्कीलपणे उत्तर देतात हा कांदा खातो, डोकं खात नाही..

येथे व्हिडीओ पाहा –

कोण आहेत दुकानदार ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या दुकानावर थांबले होते. ते दुकान मूळच्या बिहारच्या राहणाऱ्या विक्रम साह यांचे आहे. ते गेल्या १२ वर्षांपासून झारग्राममध्ये झालमुडीचे दुकान चालवत आहेत. पंतप्रधान मोदी यांचा ताफा अचानक थांबणे दुकानदार आणि पाहणाऱ्यांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रचार रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालमुडीचा आनंद घेतला. झालमुडी म्हणजे मुरमुरे किंवा कुरमुरे, हिरवी मिरची आणि दुसरे मसाले टाकून तयार केलेली एक पॉप्युलर बंगाली स्ट्रीट फूड आहे.सूत्रांनी सांगितले की झालमुडीसाठी गुगल सर्च ट्रॅफीक २२ वर्षात सर्वाधिक आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...