AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त 7 रुपये खर्च केले, 1,0,000,000 मिळाले… मजुराच्या पत्नीचं नशीबच फळफळलं; कसं घडलं?

पंजाबमधील एका मजुराच्या पत्नीने केवळ ७ रुपयांची लॉटरी खरेदी केली आणि तिचे नशीब रातोरात पालटले. बिमला देवी यांनी जिंकले तब्बल १ कोटी रुपये! या अनपेक्षित विजयाने त्यांचे कुटुंब आनंदित झाले असून, आता त्यांना मुलांचे भविष्य घडवण्यासाठी आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी हे पैसे वापरण्याची योजना आहे.

फक्त 7 रुपये खर्च केले, 1,0,000,000 मिळाले... मजुराच्या पत्नीचं नशीबच फळफळलं; कसं घडलं?
Punjab WomanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 23, 2026 | 9:34 PM
Share

आयुष्याच्या कोणत्या वळणावर कुणाचं नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. पंजाबच्या कोटकपुरा येथे राहणाऱ्या एका मजुराच्या आयुष्यातही असाच अचानक बदल झाला आहे. या कुटुंबातील महिलेने केवळ 7 रुपयाची एक लॉटरी खऱेदी केली. तिला माहीतही नव्हतं या तिकीटामुळे तिचं नशिब पालटणार आहे. या एका तिकीटाने तिचं आयुष्य रातोरात बदलणार आहे. दुसऱ्याच दिवशी या तिकीटाचा निकाल आला. अन् या कुटुंबात दिवाळीच साजरी झाली. त्या सात रुपयाच्या तिकीटावर त्यांना एक कोटीचं बक्षीस लागलं. अन् या कुटुंबाचं नशीबच फळफळलं.

पंजाबच्या फरिदाकोट जिल्ह्यातील कोटकपुरा येथील ही घटना आहे. बिमला देवी या संध्याकाळी रेल्वे रोडवर काही सामान खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी लॉटरी विकत घेण्याची त्यांची इच्छा झाली. ती रेल्वे स्टेशनजवळच्या लॉटरी स्टॉलवर गेली. तिने सिक्कीम सरकारची केवळ 7 रुपयांची लॉटरी घेतली. तिच्यासाठी ही नेहमीची खरेदी होती. आपल्या नशिबात फार मोठा चमत्कार घडेल हे तोपर्यंत तिला माहीत नव्हतं. तिकीट घेतल्यावर ती घरी गेली. दुसऱ्या दिवशी या लॉटरीचा निकाल आला. तिला लॉटरी लागल्याचं कळताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला एक कोटी रुपयाची लॉटरी लागली होती.

कुटुंबाचा आनंद गगनात

लॉटरीचा संचालक नरेश मोंगा यांनी बक्षिसाबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बिमला देवीच्या कुटुंबीयांना त्याची माहिती दिली. त्यामुळे बिमला देवीच्या घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. केवळ सात रुपयात एवढी मोठी रक्कम मिळेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर संपूर्ण कुटुंब स्टॉलवर आलं. तेव्हा नरेश मोंगा यांनी त्यांना मिठाई भरवली. यावेळी सर्वांनी मिळून भांगडाही केला. यावेळी उत्सवासारखं वातावरण झालं होतं. आपल्या सर्व आर्थिक अडचणी मिटणार असल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं.

मुलांचं भविष्य घडवायचं

एक कोटी रुपये मिळाल्यामुळे आता त्याचं काय करणार? असं बिमला देवींना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी या पैशातून आमच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. आता मुलांचं भविष्य घडवता येईल. मात्र, या पैशाचं काय करायचं हे अद्याप आम्ही ठरवलेलं नाहीये. आम्ही घरात बसू आणि त्यावर चर्चा करू. पण मुलांसाठी काही तरी व्यवसाय सुरू करायचा हे आमच्या मनात आहे. कायमस्वरुपी उत्पन्नाचं एक साधन त्या ननिमित्ताने निर्माण होणार आहे, असं बिमला देवी म्हणाल्या.

Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…