AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गायीसाठी 1 कोटीचा लग्जरी बंगला, 24 लाखाचे दागिने; या गायीचा तोराच भारी!

राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका उद्योगपतीने आपली लाडकी राधा गायीसाठी 1 कोटीचा आलिशान बंगला बांधला आहे. राधा गाय 24 लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने परिधान करते आणि तिची सेवेसाठी चार लोक तैनात आहेत. राधा घरी आल्यापासून नशीब बदलल्याने उद्योगपती नरेंद्र राजपुरोहित यांनी तिला आईप्रमाणे मानले आहे. तिची शाही जीवनशैली देशात चर्चेचा विषय बनली आहे.

गायीसाठी 1 कोटीचा लग्जरी बंगला, 24 लाखाचे दागिने; या गायीचा तोराच भारी!
Unique Cow Lover Jalore Rajasthan,Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 11:01 PM
Share

Unique Cow Lover Jalore Rajasthan : गायीला पहिली भाकर देण्याची परंपरा गावखेड्यात अजूनही सुरू आहे. कारण गायीला साक्षात लक्ष्मीचं रुप मानलं जातं. राजस्थानचे एक उद्योगपती नरेंद्र राजपुरोहित यांनी तर त्यांच्या राधा नावाच्या गायीसाठी चक्क एक कोटीचा बंगला बांधला आहे. हा दोन मजली बंगला असणार आहे. या बंगल्यात संगमरवरची लादी असणार आहे. आकर्षक डिझाइन आणि प्रत्येक सुख सुविधांनी हा बंगला सज्ज असणार आहे. नरेंद्र राजपुरोहित यांच्या घरापेक्षा गायीचा बंगला सव्वा फूट उंच असणार आहे. या राधाच्या सेवेसाठी चार लोक तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे या राधाची अख्ख्या राजस्थानमध्येच नव्हे तर देशात चर्चा आहे.

राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील राणावाडा क्षेत्रातील धानोल गाव नेहमी चर्चेत असतं. या गावात राधा नावाच्या गायीसाठी ‘राधा महल’ नावाचा बंगला बनवण्यात येत आहे. नरेंद्र राजपुरोहित यांनी हा बंगला बांधला आहे. नरेंद्र हे गौसेवक आहेत. मुंबईत त्यांचा बिजनेस आहे. रेल्वेत ते ठेकेदार आहेत. त्यांचा इलेक्ट्रिक स्कूटरचाही बिजनेस आहे. ते प्रेमाने या गायीला राधा मैया म्हणून हाक मारतात. विशेष म्हणजे राधा महल हा त्यांच्या स्वत:च्या घरापेक्षा सव्वाफूट उंच आहे. हा महल दोन मजली आहे. राधावर राजपुरोहित कुटुंबाचं एवढं प्रेम आहे की रोज सकाळ संध्याकाळी राधाची आरती केली जाते. तिला देशी तुपातील लाडू खायला दिले जातात. राधा गाय 10 किलोचे चांदीचे दागिने घालते.

सीसीटीव्हीतून दर्शन

राधा दोन वर्षाची असताना राजपुरोहित हे तिला पथमेडा गौशालेतून घेऊन आले होते. चांगला बँडबाजा वाजवत तिची मिरवणूक काढत आणलं होतं. 2015ची ही गोष्ट. राधा त्यांच्या घरी येताच त्यांचं नशीब पालटलं. 1500 रुपयांची नोकरी करणाऱ्या राजपुरोहित यांचा बिजनेस वाढला. त्यामुळे ते राधा भक्त झाले. ते मुंबईत ठेकेदारी करतात. राधाचं दर्शन केल्याशिवाय संपूर्ण कुटुंब जेवण करत नाही. नरेंद्र जेव्हा मुंबईत असतात तेव्हा सीसीटीव्हीतून दिवसातून अनेकदा राधाचं दर्शन घेतात. महिन्यातून चार वेळा गावाला जातात आणि राधाची सेवा करतात.

पण राधा सर्वात खास

नरेंद्र यांच्याकडे एकूण 25 गायी आहेत. पण राधा सर्वात खास आहे. राधा ही कांकरेज वंशाची गाय आहे. राधा घरी आल्यानंतर आपली भरभराट झाली असं त्यांचं म्हणणं आहे. नरेंद्र यांची कन्स्ट्रक्शनची कंपनीही आहे. राधाचं राहणीमान हे अत्यंत शाही आहे. प्रत्येक महिन्याची अष्टमी, धार्मिक कार्यक्रम आणि तीज सणाला तिला सजवलं जातं. तिच्या अंगावर सुमारे 10 किलो दागिने असतात. गळ्यात कंठी, डोक्यावर चांदीचा दागिना आणि ओढणीने सजलेली राधा एकदम शाही वाटते. एकूण 24 लाखांचे सोन्या चांदीचे दागिने तिच्या अंगावर असतात.

राधा आईसारखीच

मी राधाला आई सारखं मानतो. मुंबईत असतो तेव्हा लांबूनच तिचं दर्शन घेतो आणि मगच जेवण करतो. राधाच्यासाठी घराच्यासमोरच 1,800 वर्ग फुट जमिनीवर 1 कोटीचा बंगला बांधला आहे. दोन मजली हा बंगला असेल. पहिल्या मजल्यावर राधा राहील. दुसऱ्या मजल्यावर पूजा पाठ आणि साधू संतांचे निवास राहील. मी महिन्यातून चार वेळा मुंबईवरून गावाला जातो. प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला राधाची खास पूजा होते. तिला सोन्या चांदीचे दागिने घालून सजवलं जातं. 2021मध्ये राधाचं नंदीसोबत प्रतिकात्मक लग्न लावण्यात आलं. यावेळी संपूर्ण गाव वऱ्हाडी झालं होतं. राधा देशी तुपातील लापसी आणि लाडू खाते. गायींवर राजपुरोहित कुटुंबाचं एवढं प्रेम आहे की ते दरवर्षी गौशालांना लाखो रुपये दान देतात.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष