VIDEO: भैय्या मत करो.., रॅपिडो ड्रायव्हरचं भयानक कृत्य, शेवटी ढसाढसा रडू लागली तरुणी
VIDEO: रॅपिडो ड्रायव्हरचं भयानक कृत्य, तरुणीसाठी शहर नवीन होतं... घाबरलेल्या अवस्थेत सतत म्हणत होती, 'भैय्या मत करो...', 'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल..., तिने अनेक महिलांना दिला सतर्क राहण्याचा सल्ला..

VIDEO: देशाच्या कोणत्या कोपऱ्यात महिला सुरक्षित आहेत? हा सर्वात मोठा प्रश्न आहे… कारण देशातील कोणत्या न कोणत्या कोपऱ्यार महिलांवर अत्याचार होत आहेत. आता देखील असंच काही घडलं आहे. बेंगळुरू येथील एका तरुणीने पीजी रुमवर जाण्यासाठी रॅपिडो बाईक राईड बूक केली होती. पण तिच्यासोबत जे काही घडलं ते तरुणी कधीच विसरु शकत नाही… 6 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी जवळपास 4 वाजता राईड बूक केली होती. लोकेश नावाचा ड्रायव्हर तरुणीला ड्राप करण्यासाठी आली होती. पण रस्त्यात ड्राव्हर लोकेश सतत तरुणीच्या पायांना हात लावू लागला…
सतत नकार देऊन देखील ड्रायव्हर तसंच करत राहिला… अशात तरुणीने ड्रायव्हरचा व्हिडीओ शुट केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. शिवाय तरुणीने कॅप्शनमध्ये घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला आहे. तरुणीने रॅपिडो रायडरने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ बनवून आणि रायडरच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट घेऊन इंस्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत.
घडलेल्या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत तरुणी म्हणाली, ‘आज, 6 नोव्हेंबर 2025 रोजी, बेंगळुरूमध्ये, मी कधीही कल्पना न केलेली गोष्ट अनुभवली. रॅपिडो राईड बुक करून चर्च स्ट्रीटवरून माझ्या पीजीकडे परतत असताना, ड्रायव्हरने गाडी चालवताना माझा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. हे सर्व फार कमी वेळात घडलं होतं… रेकॉर्ड करु की नको… असं देखील मला कळलं नाही. त्याने पुन्हा असं केलं… मी त्याला म्हणाली, ‘भैय्या… मत करो…’
मी त्याला बाईक थांबण्यासाठी देखील सांगू शकत नव्हते… कारण मी त्या जागी नवी होते… मी प्रचंड घाबरली होती… मला रडायला येत होतं…’ कॅप्शनमध्ये तरुणी पुढे म्हणाली, ‘एका जवळ असलेल्या व्यक्तीने पाहिलं आणि विचारलं काय झालं आहे.. मी त्या व्यक्तीला घडलेला सर्व प्रकार सांगितला… तेव्हा ड्रायव्हरने माफी मागितली आणि म्हणाला असं पुन्हा करणार नाही… पण तो निघून जाताना त्याने माझ्याकडे अशा प्रकारे बोट दाखवला की मला आणखी असुरक्षित वाटू लागले.
View this post on Instagram
‘घडलेली घटना मी शेअर केली कारण महिलांनी अशा गोष्टी सहन नाही केल्या पाहिजे… ना टॅक्सीमध्ये, ना बाईकवर, ना कुठेही. माझ्यासोबत असं काही घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. पण मी आता गप्पा राहू शकत नव्हती… कृपया सतर्क व्हा… तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि गप्प बसू नका. आतापर्यंत, या व्हिडिओला 62 लाखहून अधिक व्ह्यूज आणि 70 हजार हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
