उंदराला पकडणं मांजरीला होत नाही शक्य, काय घडतं शेवटी? पूर्ण पाहा हा Viral Video

मांजर (Cat) आणि उंदीर (Rat) यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. कधी-कधी असे काही व्हिडिओही व्हायरल होतात, जे पाहून लोक हसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मांजरासमोर उंदीर का उड्या मारू लागतो. हे कळत नाही.

उंदराला पकडणं मांजरीला होत नाही शक्य, काय घडतं शेवटी? पूर्ण पाहा हा Viral Video
मांजर आणि उंदीर

मांजर (Cat) आणि उंदीर (Rat) यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. तुम्ही ती कथा नक्कीच ऐकली असेल, ज्यामध्ये मांजराच्या दहशतीला घाबरून उंदीर त्याच्या गळ्यात घंटा बांधण्याची योजना आखतात, जेणेकरून ते येतील हे कळेल आणि सर्व उंदरे वेळेवर पळून जातील. पण मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार हा सगळ्यात मोठा प्रश्न होता, कारण जो कोणी मांजराकडे गेला त्याचा फडशा पडणार हे निश्चित होते. ही तर कथा आहे, पण त्यांच्यातील वैर मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यामध्ये उंदरांना पाहून मांजर त्यांना पकडण्यासाठी धावते. कधी-कधी असे काही व्हिडिओही व्हायरल होतात, जे पाहून लोक हसतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मांजरासमोर उंदीर का उड्या मारू लागतो. हे कळत नाही.

मांजरीभोवती मारतो फेऱ्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मांजर बसली आहे आणि उंदीर तिच्यासमोर आडवे होत तिच्याभोवती फेऱ्या मारायला लागतो. असे करत असताना तो मांजराच्या शेपटीपर्यंत पोहोचतो, त्यानंतर मांजर तिथून उठते आणि उंदराला मारण्याचा प्रयत्न करते. पण तिला ते शक्य होत नाही.

क्वचितच पाहिला असेल असा व्हिडिओ हा खूप मजेदार व्हिडिओ आहे. असा व्हिडिओ तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर wonderfuldixe नावाने शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत 2.8 दशलक्ष म्हणजेच 28 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 71 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकदेखील केले आहे.

यूझर्सच्या कमेंट्स त्याचबरोबर व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूझरने ‘ड्रामा’ असे लिहिले, तर दुसऱ्या यूझरने गंमतीत कमेंट केली, की ‘उंदीर गंभीर जखमी आहे आणि तो चालू शकत नाही’.

Viral Video : छोटा गजराज घसरला मग सर्व कुटुंब आलं धावून… पाहा, कशी केली मदत

Viral : चिखलात खेळणाऱ्या मुलांना घ्यायला येते आई आणि.., पुढे काय होतं? पाहा Video

…आणि बाटलीतलं सर्व पाणी संपवतं माकड, प्राण्यावरील प्रेमाचा Video होतोय Viral

Published On - 4:22 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI