AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरीब मुस्लिम बांधवासोबत जे झालं, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! धारवाडमधील संतापजनक घटना

मुंबईः सध्या सोशल मीडियावर (S0icial Media) एक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गरीब आणि सामान्य कलिंगड (watermelon) फेरीविक्रेता आपला तो छोटो मोठा व्यवसाय कसाबसा करतो आहे. त्या सामान्य गरीब कलिंगड विक्रेत्याच्या हातगाडीवरील कलिंगड श्रीराम सेनेच्या (Bajran Dal) कार्यकर्त्यांनी रस्त्यावरुन आपटून फोडली आहेत, त्या फोडलेल्या कलिंगडांचा खच रस्त्यावर दिसत आहे. हे दृश्य बघून कोणताही माणूस […]

गरीब मुस्लिम बांधवासोबत जे झालं, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! धारवाडमधील संतापजनक घटना
श्रीराम सेनाच्या कार्यकर्त्यांकडून धारवाडमध्ये फळविक्रेत्याचे नुकसानImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 10, 2022 | 1:02 PM
Share

मुंबईः सध्या सोशल मीडियावर (S0icial Media) एक पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गरीब आणि सामान्य कलिंगड (watermelon) फेरीविक्रेता आपला तो छोटो मोठा व्यवसाय कसाबसा करतो आहे. त्या सामान्य गरीब कलिंगड विक्रेत्याच्या हातगाडीवरील कलिंगड श्रीराम सेनेच्या (Bajran Dal) कार्यकर्त्यांनी रस्त्यावरुन आपटून फोडली आहेत, त्या फोडलेल्या कलिंगडांचा खच रस्त्यावर दिसत आहे. हे दृश्य बघून कोणताही माणूस हळहळल्याशिवाय राहणार नाही, इतकं वाईट त्या गरीब कलिंगड फेरीविक्रेत्याची अवस्था बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबतची पोस्ट राज अस्नोडकर यांनी केली असून त्या पोस्टमध्ये त्यांनी सविस्तर लिहिले आहे.

राज अस्नोडकर यांनी आपल्या पोस्टमध्ये श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे तुम्हाला जमते का बघा असं उपरोधान म्हटलं आहे. या घटनेची पोस्ट करण्यात आल्यानंतर अनेकांनी त्या पोस्टला कमेंट आणि शेअर केली आहे. फेसबुकवरील पोस्टमध्ये कलिंगड विक्रेत्याला मारहाण झाल्याचे दिसत नाही पण या पोस्टमध्ये मारहाणीचा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे हे जमते का बघा असंही आवाहन केले गेले आहे. ज्या व्यावसायिकाच्या हातगाडीवरील कलिंगडांचे नुकसान केले गेले आहे, तो मुस्लिम असल्याचा उल्लेखही केला गेला आहे. श्रीराम सेनेचे कार्यकर्ते गळ्यात बजरंग दलाची पट्टी घालून ते कलिंगड फोडत असल्याचे दिसत आहे. कलिंगड फोडणाऱ्यांच्या कृत्याला पराक्रम आणि शौर्यही असंही संबोधन्यात आले आहे. या घटनेविषयी तुमची आई विचारेल तेव्हा इतिहासातील संदर्भ देत आईचं मुंडकं उडवायला सांगितलेल्या कथेचीही राज अस्नोडकर यांनी आठवण करुन दिली आहे.

पोलीस बघ्याच्या भूमिकेत

धारवाडमधील हनुमान मंदिराबाहेर घडलेल्या या घटनेचा हा व्हिडीओ ट्विविटरवरसुद्धा शेअर केला गेला आहे. त्यामध्ये श्रीराम सेनेच्या  गुंडाकडून गरीब मुस्लिम फळविक्रेत्याच्या हातगाडीची तोडफोड होत असूनही त्या ठिकाणी असणाऱ्या पोलिसांनीही कोणताही हस्तक्षेप केला नाही म्हणून मोहम्मद जुबेर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. बोम्मई यांना टॅग करुन उपस्थित असलेल्या पोलिसांनी कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित केला गेला आहे.

दबाव गट निर्माण

धारवाडमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. घडलेल्या या प्रकारामुळे एका विशिष्ट विचारसरणीचा कसा दबाव गट तयार होत असून ते चुकीचे असल्याचे मत मांडण्यात आले आहे. कलिंगड फोडून टाकण्यात आल्यानंतर कलिंगड विक्रेता आपली हातगाडी घेऊन जाताना दिसत आहे.

इतकं करुन बघा असा सल्ला

धारवाडमधील हातगाडी चालवणाऱ्या कलिंगड विक्रेत्याची ही अवस्था करणाऱ्या पाहून कोणत्याही माणसाला पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राज अस्नोडकर यांनी शेवटी हे कृत्य करणाऱ्याना इतकं करुन बघा असा सल्ला दिला आहे. अस्नोडकरांच्या या पोस्टमध्ये इतिहास आणि वर्तमान काळातील घटना सांगून हा व्हिडीओ सगळीकडे पसरवा असेही सांगण्यात आलेआहे.

संबंधित बातम्या

Air India Air Services : नोकरीची सुवर्णसंधी ! एकूण 604 रिक्त जागा, शेवटची तारीख 22 एप्रिल, 10वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी !

Kolhapur | पहाटेचं सरकार गेल्यामुळे भाजपाचा थयथयाट, सत्तेसाठी देशात हिटरशाही, कोल्हापुरात नाना पटोलेंचा हल्लाबोल

टाटा कारवर मिळवा बंपर ऑफर, एक्सचेंजसह साडेआठ लाखांपर्यंतचा भरघोस फायदा…

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.