AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संस्मरणीय लग्नसोहळा : पहाडी आवाजात शिवगर्जना म्हणत नवरदेवानं लग्नमंडपात संचारला उत्साह, Video Viral

सांगली : पलूस (Palus) येथे नवरदेवाने (Groom) आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करत असताना मंगलाष्टकाच्या अगोदर सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवगर्जना (Shivgarjana) म्हणून सर्वांच्या अंगावर शहारे आणले.

संस्मरणीय लग्नसोहळा : पहाडी आवाजात शिवगर्जना म्हणत नवरदेवानं लग्नमंडपात संचारला उत्साह, Video Viral
आपल्या लग्नात शीवगर्जना म्हणत असताना वर ओंकार निवास पाटील
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 13, 2022 | 2:42 PM
Share

सांगली : पलूस (Palus) येथे नवरदेवाने (Groom) आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करत असताना मंगलाष्टकाच्या अगोदर सोहळ्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवगर्जना (Shivgarjana) म्हणून सर्वांच्या अंगावर शहारे आणले. पलूस येथील संग्राम हॉलमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. ओंकार निवास पाटील आणि प्रियंका रघुनाथ मोरे यांचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ओंकारने शिवगर्जना म्हणत आपल्या वैवाहिक जीवनास सुरुवात केली. लग्नसराईचा काळ असल्याने सर्वत्र आपल्याला विवाहसोहळ्याची धामधूम दिसून येतेय. घरात लगीनघाई असल्याने प्रत्येकजण त्या कामात असतो. लग्न ही आयुष्यातली एक महत्त्वाची घटना असल्याने ती संस्मरणीय व्हावी असा प्रयत्न प्रत्येकाचा असतो.

वातावरणात उत्साह

पलूस येथील नवरदेवाने आपला विवाहसोहळा कायम स्मरणात राहावा, यासाठी हा हटके असा प्रयत्न केला. लग्नानंतरच्या आयुष्याची एक सकारात्मक सुरुवात करण्याच्या हेतूने नवरदेव ओंकार निवास पाटील याने आपल्या विवाह सोहळ्यात शीवगर्जना म्हणत वातावरण उत्साहमय करून टाकले. अत्यंत भारदस्त अशा आवाजात जोश निर्माण होईल, अशा स्वरात त्याने शीवगर्जना म्हटली.

सर्वत्र लग्नाची चर्चा

जवळपास एक मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. शीवगर्जना झाल्यानंतर माता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला. तर शेवटी हर हर महादेव म्हणत शीवगर्जना पूर्ण केली. आता या अनोख्या लग्नसोहळ्याची आणि शीवगर्जनेची चर्चा सर्वत्र होतेय. हा व्हिडिओही व्हायरल होतोय.

आणखी वाचा : 

Pushpa fever : राजकारण्यांनाही चढला पुष्पाचा ज्वर, आता बीडचे संदीप क्षीरसागर म्हणतायत…

Video : अनोखी वरात! शेतकरी पुत्राची वडस्कर कुटुंबानं काढली ट्रॅक्टरवरून वरात, यवतमाळातल्या लग्नाची चर्चा

Viral Video : हजारो फूट उंचीवर जोडप्याचा Romance; असा साजरा केला #kissday

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली