AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Seema Haider-Sachin Meena : सीमा हैदरचा नवरा सचिन कुठे गेला? बेडरुममध्ये बिछान्याच्या मागे दिसला या व्यक्तीचा फोटो

Seema Haider-Sachin Meena : पाकिस्तानातून भारतात आल्यापासून सीमा हैदर चर्चेचा विषय ठरली आहे. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये एका फोटोमुळे अनेकांना धक्का बसलाय. लोक तिला विचारतायत की सचिन कुठे गेला?

Seema Haider-Sachin Meena : सीमा हैदरचा नवरा सचिन कुठे गेला? बेडरुममध्ये बिछान्याच्या मागे दिसला या व्यक्तीचा फोटो
Seema Haider-Sachin Meena
| Updated on: Sep 12, 2026 | 4:48 PM
Share

पाकिस्तानातून भारतात ग्रेटर नोएडामध्ये आलेली सीमा हैदर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. पती सचिन मीणासोबत मिळून सीमा सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ बनवायची. सचिन आणि सीमाला मुलं असून त्यांचं कुटुंब आनंदात राहत आहे. या दरम्यान सीमा हैदरने इन्स्टाग्रामवर एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला. त्यात बेडरुममध्ये पती सचिनच्या जागी वकिल एपी सिंह यांचा फोटो दिसला. हा फोटो व्हिडिओमध्ये दिसल्यापासून लोक सचिन कुठे गेला? अशी विचारणा करत आहेत. सीमा हैदरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती हिरव्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. मागे एक मोठा बेड आहे. बेडरुममध्ये शूट केलेल्या या व्हिडिओमध्ये मागच्याबाजूला वकिल एपी सिंह यांचा फोटो दिसतोय. बेडच्या बरोबर वर हा वकिलाचा फोटो लावलेला आहे. एपी सिंह हे सचिन आणि सीमा हैदरचे वकिल आहेत. त्यांनी सुरुवातीपासून सीमा हैदरचा खटला लढला आहे. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नये, तिला भारताचं कायदेशीर नागरिकत्व कसं मिळेल? यासाठी प्रयत्न केलेत. सीमा हैदर एपी सिंह यांना आपला भाऊ मानते. हा व्हिडिओ चर्चेता विषय ठरतोय.

सीमाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसतेय. ‘तुझको मैंने ये दिल दे दिया’ हे गाणं वाजतय. तिचे लूक आणि एक्सप्रेंशंसचं कौतुक होतय. व्हिडिओला आतापर्यंत 10 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे या व्हिडिओवर कमेंट्स येत आहेत. एका युजरने वकिलाच्या फोटोकडे इशारा करताना म्हटलय की, मागे बघ मागे. एक यूजरने कमेंटमध्ये लिहिलय की, सीमा हैदर खूप सुंदर दिसतेय. हा व्हिडिओ पाहताना अनेक युजर्सनी मागे असलेल्या एपी सिंह यांच्या फोटोचा उल्लेख केलाय. सोशल मिडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ फक्त इन्स्टाग्रामवरच नाही, तर लोक एक्सवर सुद्धा शेअर करतायत.

दोघांची ओळख कशी झालेली?

सीमा हैदर भारतात आल्यापासून ती चर्चेत आहे. मागच्या काही वर्षांपासून दोघे सतत चर्चेत आहेत. पबजी गेमच्या माध्यमातून दोघांची ओळख झालेली. त्यानंतर दोघांची मैत्री प्रेमात बदलली. सीमा आपल्या मुलांना घेऊन नेपाळमार्गे भारतात दाखल झाली. सीमाचा पाकिस्तानी पती दुबईत राहतो. भारतात आल्यानंतर सीमा सचिन मीणाच्या ग्रेटर नोएडा येथील गावी रहायला गेली. दोघेही वेळोवेळी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत असतात.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर