शर्टाच्या बटणांसाठी वापरतात प्राण्यांची हाडे, हैराण करणारा VIDEO समोर!

Shirt Button : तुमच्या शर्ट आणि पॅटला असलेली बटणे प्राण्यांच्या हाडांपासूनही बनवली जातात. याचा एक व्हिडिओ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शर्टाच्या बटणांसाठी वापरतात प्राण्यांची हाडे, हैराण करणारा VIDEO समोर!
Shirt Button Video
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 29, 2025 | 4:36 PM

तुमच्या शर्ट आणि पॅटला असलेली बटणे कशापासून बनलेली असतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. अनेकांना वाटत असेल की ही बटणे प्लास्टिक किंवा लाकडापासून बनलेली असतील. मात्र तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल की, ही बटणे प्राण्यांच्या हाडांपासूनही बनवली जातात. शर्ट आणि पॅन्टसाठी लागणारी बटणे हाडांपासून बनत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात स्पष्टपणे दिसत आहे की ही बटणे हाडांपासून बनवली जात आहे. आता पर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती प्राण्यांच्या हाडांनी भरलेल्या बॅगा खाली ओतत आहे. यानंतर या हाडांचा खराब झालेले भाग कापून बाजूला केला जातो आणि नंतर फेकून दिला जातो. हाडांचा चांगला भाग गरम पाण्यात उकळला जातो आणि स्वच्छ केला जातो. यानंतर ही हाडे पातळ आणि लहान आकारात कापली जातात. त्यानंतर मशीनच्या मदतीने याचे लहान गोल तुकडे केले जातात. त्यानंतर त्याला होल पाडली जातात आणि पॉलिश केले जाते. ही प्रक्रिया झाल्यानंतर बटणे रंगीत पाण्यात बुडवली जातात. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा पॉलिश केले जाते, ज्यामुळे ती चमकदार दिसतात.

व्हिडिओला लाखो व्ह्यूज

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर्कशॉपथिंग्स या आयडीवर शेअर केलेला हा व्हिडिओ 60 लाख लोकांनी पाहिला आहे. तर 60 हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तसेच अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एकाने म्हटले की, ‘मला कधीच वाटले नव्हते की हाडांपासून बटणे बनतात.’ दुसऱ्या एकाने म्हटले की, ‘मी इतक्या वर्षांपासून ही बटणे वापरत आहे, पण आज मला पॅन्ट आणि शर्ट घालायला भीती वाटत आहे.’ आणखी एका नेटकऱ्याने म्हटले की, ‘आता मला समजले की ही बटणे इतकी मजबूत का असतात.’ त्याचबरोबर इतर अनेकांनी म्हटले की, बटणे हाडांपासून बनतात यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही.’