‘सर, मैं बिक गया हूं ..’ भन्नाट Resignation Letter सोशल मीडियावर व्हायरल
Funny Resignation Letters : काही गोष्टी फक्त चांगल्या दिसतात, पण प्रत्यक्षात त्या करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसते. इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या काही रेझिग्नेशन लेटरबद्दलही असंच काहीसं आहे. भन्नाट वाटणारी ही लेटर्स खूप व्हायरल झाली आहेत, त्यातल्या एका लेटरची तर प्रचंड चर्चा आहे.

आपलं जुनं ऑफीस सोडताना, पदाचा राजीनामा देताना, कर्मचारी शक्य तितकं व्यावसायिक वागण्याचा प्रयत्न करतात. पण आजकाल लोक सोशल मीडियावर ट्रेंड म्हणून काही अशी रेझिग्नेशन लेटर्स पोस्ट करत आहेत, जे वाटून लोकांना मात्र हसू आवरत नाहीये. एवढंच नव्हे तर काही लोक असे आहेत, ज्यांना स्वत:देखील असंच रेझिग्नेशन लेटर द्यायची इच्छा आहे. पण हे फक्त मनोरंजनापुरतं आहे, याचीही त्यांना जाणीव आहे. सध्या इंटरनेटवर असंच एक रेझिग्नेशन लेटर तूफान व्हायरल झालं असून तूफान धूमाकूळ घालत आहे.
सर, मैं बिक गया हूं…
हे रेझिग्नेशन लेटर तर व्हायरल मीम टेम्प्लेट बनलं आहे. जे सध्या प्रत्येक व्यक्ती शेअर करत आहे. या छोट्याशा रेझिग्नेशन मध्ये थेट कारण सांगितलं आहे. ‘ हाय सर, मी विकला गेलोय, समोरची कंपनी 4 पट जास्त पैसे देत्ये’ असं त्या लेटरमध्ये लिहीलं आहे.
इंस्टाग्रामवर 5 लाखांहून अधिक यूजर्सनी ही पोस्ट लाईक केली आहे. तर पोस्टवर 2 हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत, ज्यामध्ये लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
काल तुम्ही माझा अपमान करायला नको होता..
तर अशाचा एका पुढल्या मजेदार रेझिग्नेशन लेटरमध्ये थेट सुनावण्यात आलं आहे. ‘ डिअर सर, कालच्या बैठकीत तुम्ही सर्वांसमोर माझा अपमान करायला नको होता.’ आतापर्यंत या पोस्टला 14 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. @singhvishnurajput_ नावाच्या हँडलवरून ते इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे.
View this post on Instagram
मी 3 कोटी जिंकले
या राजीनाम्यात तर मजाच आह. त्याने लिहीलं, ‘नमस्कार साहेब, मी उद्यापासून ऑफिसला येणार नाही, मी ड्रीम 11 वर 3 कोटी रुपये जिंकले आहेत.’
View this post on Instagram
मजा येत नाहीये
तर पुढच्या लेटरमध्ये फक्त या ‘मला मजा येत नाहीये’ असे लिहिले आहे. मात्र, असा मजकूर लिहिलेला मेल यापूर्वीही व्हायरल झाला आहे, ज्यावर अनेक यूजर्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या.
View this post on Instagram
सर्वात व्हायरल लेटर..
मात्र या सर्व रेझिग्नेशन लेटर्समध्ये सर्व राजीनामा पत्रांपैकी, ‘मैं बिक गया हूं,’ असे लिहिलेले हे पत्र इंटरनेटवर सर्वाधिक व्हायरल झाले आहे.
