Video | ‘Koi Sehri Babu’ गाण्यावर छोट्या मुलीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !

सध्या तर एका छोट्या मुलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी कोई लहरी बाबु कोई शहरी बाबू या हिंदी गाण्यावर मजेदार डान्स करत आहे. या मुलीचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

Video | ‘Koi Sehri Babu’ गाण्यावर छोट्या मुलीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !
small girl dance

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये छोट्या मुलांचे व्हिडीओ तर आवडीने पाहिले जातात. लहान मुलांचा निरागसपणा, त्यांचा अल्लडपणा नेटकऱ्यांना चांगलाच आवडतो. सध्या तर एका छोट्या मुलीचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी कोई लहरी बाबु कोई शहरी बाबू या हिंदी गाण्यावर मजेदार डान्स करत आहे. या मुलीचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरलाय.

छोट्या मुलीचा भन्नाट डान्स

आपल्या देशात प्रतिभेची कमी नाही. कोण कधी काय करेल हे सांगता येत नाही. या व्हिडीओमध्ये छोट्या मुलीने केलेला डान्स नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. ही छोटी मुलगी बिग बॉस ओटीटी विजेता दिव्या अग्रवाल हिच्या डान्सची कॉपी करत आहे. या मुलीच्या मागे एक मोठा टीव्ही लावण्यात आलाय. मुलीने दिव्या अग्रवाल सारखेच छान आणि आकर्षक कपडे परिधान केले आहेत. दिव्या अग्रवाल जशाप्रकारे डान्स करेल अगदी तशाच प्रकारे ही मुलगी थिरकत आहे. छोट्या मुलीने घेतलेले ठुमके आणि तिच्या चेहऱ्यावरील हावभाव लोकांना आवडले आहेत. तिच्या डान्समध्ये एक निरागसपणादेखील दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Tania & Sony (@tania_and_sony)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडिओ पाहून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. या मुलीचा डांन्स अतिशय छान असल्याचे एका नेटकऱ्याने म्हटलेय. तर दुसर्‍या एका नेटकऱ्याने मला हा डान्स खूप आवडला असं सांगितलंय. हा व्हिडिओ वेगवेगळ्या माध्यमांवर उस्फूर्तपणे शेअर केला जात असून त्याला आतापर्यंत हजारो लाईक्स आलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला या इंस्टाग्रामच्या ‘tania_and_sony’ या अकाउंटवर पाहता येईल.

इतर बातम्या :

पाकिस्तानात यात्रेला गेलेल्या विवाहित भारतीय महिलेने केलं लाहोरच्या पुरुषाशी लग्न!

Priyanka chopra : matrix resurrections च्या नव्या व्हिडिओत प्रियंकाच्या अदांवर चाहते फिदा, हा हटके अंदाज पाहा

लहान मुलाचे सुपर क्यूट एक्सप्रेशन पाहून तुमचा दिवस बनून जाईल, व्हिडीओ नक्का पाहा


Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI