Snake : सापांच्या जगात केवळ दोनच रंग; हा विशेष अवयव करतो नाईट व्हिजन कॅमेऱ्यासारखा काम, म्हणून अंधारातही करतो शिकार

Snake Vision : सापांना केवळ दोनच रंग कळतात. मग ते रात्रीच्या वेळी अथवा अंधारात शिकार तरी कसे करतात असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर तज्ज्ञांनी दिले आहे. या एका खास अवयवामुळे सापांना शिकार करता येते. त्यांना शिकारीचा अचूक अंदाज बांधता येतो. तुम्हाला माहिती आहे का?

Snake : सापांच्या जगात केवळ दोनच रंग; हा विशेष अवयव करतो नाईट व्हिजन कॅमेऱ्यासारखा काम, म्हणून अंधारातही करतो शिकार
| Updated on: Sep 20, 2025 | 1:29 PM

सापांना केवळ दोनच रंग (snake vision) कळतात. मग ते रात्रीच्या वेळी अथवा अंधारात शिकार तरी कसे करतात असा प्रश्न अनेकांना पडतो. या प्राण्याचे छोटे डोळे असतात. ते रात्री कसे पाहु शकतात असेही अनेकांना वाटते. त्यांची दृष्टी फार लांबपल्ल्याची नसताना ते शिकार कशी शोधतात असे काहींच्या मनात येते.त्याचे उत्तर तज्ज्ञांनी दिले आहे. या एका खास अवयवामुळे सापांना शिकार करता येते. त्यांना शिकारीचा अचूक अंदाज बांधता येतो. तुम्हाला माहिती आहे का?

हिट रिसेप्टर म्हणजे काय?

वाईल्ड लाईफ तज्ज्ञांनी याचं उत्तर दिले आहे. त्यांच्या मते बर्मिज पायथन, इंडियन रॉक पायथन आणि रेटिकुलेटेड पायथन या सारख्या सापांच्या जबड्यात वरच्या बाजूस छिद्र असतात. त्याला हिट रिसेप्टर असे म्हणतात. त्याच्या आधारे साप रात्री काळ्याकुट्ट आंधारातही सहज शिकार करतात. ते समोरील वस्तू, प्राणी काय आहे याचा अंदाज लावू शकतात.

पायथनमध्ये आढळणारा हे हिट रिसेप्टर (hit receptor) आजुबाजूच्या वस्तू, प्राण्यांची थर्मल इमेज तयार करते. त्याआधारे त्या प्राण्याची जाणीव सापाला शिकार करताना होते. हिट रिसेप्टरच्या मदतीने सापाला उष्ण रक्त असणाऱ्या प्राण्याचा लाल रंग तर थंड रक्त असणाऱ्या प्राण्यांची थर्मल इमेज निळ्या रंगात त्यांना जाणीव होते. तर याच सिस्टिमने शिकार किती दूर आहे, याचा अंदाजही त्यांना येतो. त्याआधारे ते शिकार करतात.

पायथनमध्ये आढळणारी हिट रिसेप्टर प्रमाणेच व्हायपर,कोब्रा आणि करॅत या सापांना डोळे आणि नाकाच्या मध्यभागी दोन छिद्र असतात. त्यांना पिट्स असे म्हणतात. या पिट्सच्या उपयोगाने साप रात्रीच्या वेळी जवळपासच्या प्राण्यांची, वस्तूंची थर्मल इमेज रुपाने जाणीव होते. ते शिकार करून त्यांची भूख शमवतात. त्यामुळे दृष्टी फार लांबचा पल्ला गाठू शकत नसली तरी हिट रिसेप्टरच्या मदत त्यांना होते आणि त्याआधारे ते काळ्याकुट्ट अंधारातही शिकार करतात. म्हणजे सापांना लाल रंग आणि निळ्या रंगात प्राण्यांची आकृती जाणवेत. त्याआधारे ते चपळाईने शिकार करतात.