Video : लग्नापेक्षाही मोठा घटस्फोटाचा सोहळा! महिलेची ‘डिव्होर्स पार्टी’ पाहून नेटकरी थक्क

लग्न मोडल्यानंतर एका महिलेने पार्टी आयोजित केली आणि तिला नाव दिल डिवोर्स पार्टी. मैत्रिणींना बोलावलं. छान कपडे घातले, केक कापला आणि अगदी लग्नासारखा सोहळा साजरा केला. तिच्या या अनोख्या डिव्होर्स पार्टी चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Video : लग्नापेक्षाही मोठा घटस्फोटाचा सोहळा! महिलेची ‘डिव्होर्स पार्टी’ पाहून  नेटकरी थक्क
divorce party
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 17, 2026 | 6:59 PM

लग्न ठरलं की घरात आनंदाचं वातावरणं, लग्नाचा मंडप, पाहुण्यांची गर्दी,केक आणि सेलीब्रेशन.. हे सगळं पाहायला मिळतं. पण एका महिलेने याच सगळ्या गोष्टी घटस्फोटांनंतर केल्या आहेत. लग्न मोडलं म्हणून दु:जिख व्यक्त करण्याऐवजी तिनं आपल्या नव्या आयुष्याची सुरूवात मोठ्या थाटात केली आहे. मैत्रिणींना बोलावलं. छान कपडे घातले, केक कापला आणि अगदी लग्नासारखा सोहळा साजरा केला. तिच्या या अनोख्या डिव्होर्स पार्टी चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

दक्षिण कोरियातील 37 वर्षिय चो सेउंग – योन ही सिंगल मदर आणि कंटेट क्रिएटर आहे. डिवोर्सनंतर आयुष्य संपलं म्हणून खचण्याऐवजी तिनं त्याकडे नव्या सुरूवातीच्या रूपात पाहिलं. याच विचारातून तिनं खास ‘डिव्होर्स सेरेमनि’ आयोजित केली. या सोहळ्यात तिने जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. चो हिनं छान ड्रेस घातला. मित्रांसोबत फोटो काढले. मोठा केक कापला आणि उपस्थिांसमोर भाषणंही केलं.

Loading...

 

 

लग्नापेक्षा घटस्फोटाचा सोहळा केला स्पेशल

चो हिनं या सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये तिचे मित्रमैत्रिणी टाळ्या वाजवताना, आनंद व्यक्त करताना आणि तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत. या व्हिडिओवर लिहिलंल वाक्यंही लक्ष वेधून घेत आहे. तुमचा घटस्फोटाचा सोहळा तुमच्या लग्नापेक्षाही शानदार होता. असं त्यात म्हटलं आहे. हा व्हिडिओ शेअर करताना चो हिनं आपल्या कठीण काळात साथ देणाऱ्या लोकांचे आभारही मानले.

घटस्फोट म्हणजे अपयश नाही

चो हिंन बीबीसीशी बोलताना सांगितलं की, घटस्फोट झालेल्या महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा, अशी तिची इच्छा आहे. लग्न संपलं म्हणजे एखाद्या महिलेचं आयुष्य किंवा तिची ओळख संपली नाही. लग्नाच्या नात्यापलीकडेही स्वत: ची ओळख असते. हे तिला दाखवून द्यायचं होतं. त्यामुळे तिनं घटस्फोटाला अपयश न मानता नव्या आयुष्याचा टप्पा म्हणून साजरा केला.

तिच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्या धाडसाचं कौतुक करत नव्या सुरूवातीसाठी शुभेच्छा दिल्या. तर काहींनी घटस्फोटाचा सार्वजनिक सोहळा करण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला. मात्र चो हिच्यासाठी हा केवळ पार्टीचा कार्यक्र नव्हता तर कठीण काळात साथ देणाऱ्या माणसांचे आभार मानण्याची आणि स्वत:ला पुन्हा नव्याने स्वीकारण्याची संधी होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us