AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ur Trending In My Heart : आठवड्याभरात ‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ तुफान हिट, जेन झी प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद

Ur Trending In My Heart : टीव्ही9 चे संपादक उमेश कुमावत यांच्या 'यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट' या गाण्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

Ur Trending In My Heart : आठवड्याभरात 'यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट' तुफान हिट, जेन झी प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद
| Updated on: Nov 17, 2026 | 6:57 PM
Share

सध्या सोशल मीडियावर एखादं गाणं लोकप्रिय होण्यासाठी फारसा वेळ लागत नाही. एखादी हटके संकल्पना, आकर्षक शब्द आणि आजच्या तरुणाईशी जोडली जाणारी भावना असेल, तर ते गाणं काही दिवसांतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकतं. याचाच प्रत्यय सध्या ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या नव्या गाण्याच्या लोकप्रियतेतून येत आहे. रिलीज झाल्यानंतर अवघ्या आठवड्याभरात या गाण्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, विशेषतः जेन झी तरुणाईकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आठवड्याभारत या गाण्यानं युट्युबवर 1 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.

‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट‘ गाण्याची क्रेझ

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा तरुणाईच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. ट्रेंडिंग, रील्स, लाइक्स आणि व्हायरल होणाऱ्या गोष्टी या सगळ्यांचा प्रभाव तरुणांच्या दैनंदिन जगण्यावर दिसून येतो. याच डिजिटल विश्वाची भाषा आणि प्रेमाची भावना यांची सांगड ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्यात घालण्यात आली आहे. त्यामुळे हे गाणं तरुणाईला विशेष भावत असल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नाव आणि त्यामागची संकल्पना. प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या पिढीनं वापरलेल्या सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या भाषेचा अनोखा वापर यात करण्यात आला आहे.

टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमत यांनी या गाण्याचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्याच आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलंय. उमेश कुमावत हे पत्रकारिता क्षेत्रातील मोठं नाव आहे. त्यांचं हे दुसरं गाणं असून याआधी त्यांनी ‘थक गया मै साला’ या गाण्याचं लिखाण, गायन केलेलं आहे. त्यांच्या नव्या ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय.

View this post on Instagram

A post shared by Umesh Kumawat (@umeshk73)

दरम्यान, नऊ वर्षांपूर्वी सुचलेली या गाण्याची कल्पना आजच्या जेन झीच्या आवडीशी जुळणारी ठरतेय. त्यामुळे यंदाच्या न्यू इयर पार्टीच्या प्लेलिस्टमध्ये ‘यु आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्याला आवर्जून स्थान मिळणार, यात काही शंका नाही. अवघ्या सात दिवसांत चर्चेत आलेल्या या गाण्यानं जेन झींच्या संगीतविश्वात आपली जागा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

Follow Us
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके...
Shivsena : Deepak Kesarkar : बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दीपक केसरकरांना घेरलं; शिवसैनिकांची 50 खोके, एकदम ओके म्हणत जोरदार घोषणाबाजी
मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकरांचं पुन्हा वादग्रस्त..
Indurikar Maharaj : मुली मुलांवर नाही, पैशावर प्रेम करतात; इंदुरीकर महाराजांचं मीरा-भाईंदरमधील वक्तव्य, नव्या वादाची शक्यता
एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून...
MS Dhoni Retires from IPL : एक युग संपलं... CSK चा कणा, चाहत्यांचा लाडका थाला आता खेळाडू म्हणून IPL मध्ये दिसणार नाही, ही नवी जबाबदारी सांभाळणार
योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना....
Shivsena : योगेश कदम ते दादा भुसे… पाच आमदारांच्या सह्यांचा उल्लेख; शिवसेना सुनावणीत ध्रुव मेहतांचा युक्तिवाद
शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभू
Shivsena : शिवसेना पक्षाच्या सुनावणीत ध्रुव मेहतांचा मोठा युक्तिवाद; सुनील प्रभूंच्या व्हीपमध्ये.....
....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के
Naresh Mhaske : ....तर मी माझं दुकान बंद करेन, माझी शिवसेना मी बंद करेन; नरेश म्हस्के असं का म्हणाले?
संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; कोर्टात आज काय घडलं?
Sanjay Raut Hearing Update : संजय राऊत प्रकरणात 8 डिसेंबरला पुन्हा सुनावणी; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं?
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला