Video : अचानक विमान रद्द झालं, मग प्रवासी एअरपोर्टच्या रनवे वरच बसले आंदोलनाला
ऐनवेळी विमान रद्द झालं.प्रवाशांच्या विमान रद्द होण्याची कोणतीही माहिती आधी देण्यात आली नाही. त्यामुळे प्रवासी संतापले आणि प्रवाशांनी रनवेवर आंदोलन मांडले. प्रवाशांनी ज्या प्रकारे आंदोलन केले आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

विमान प्रवास म्हटलं की आरामात प्रवास करता येईल, वेळ वाचेल अशी अपेक्षा असते. पण विमानंच रद्द झालं आणि त्यात प्रवाशांना विमानतळावर योग्य व्यवस्था मिळाली नाही. हा प्रकार मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या प्रवाशांसोबत घडला. स्पाईसजेटचं विमान रद्द झाल्यानंतर संतप्त प्रवाशांनी चक्क धावपट्टीवरचं आंदोलन ठोकलं आहे. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाची सेवा रद्द करण्यात आली. यामुळे विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा खोळंबा झाला. विमान रद्द झाल्यानंतर प्रवाशांना झालेल्या गैरसोयीमुळे ही परिस्थीती तणावरपूर्ण झाल्याची व्हिडिओमध्ये दिसत आहे.
धावपट्टीवरचं बसले प्रवासी
व्हायरल व्हिडिओमध्ये काही प्रवासी धावपट्टीवर बसलेले दिसत आहेत. विमान रद्द झाल्यानंतर प्रवाशांनी अशा प्रकारे नाराजी केली आहे. विमानतळावर नेमकी कोणती व्यवस्था देण्यात आली होती आणि त्यांना धावपट्टीवर बसण्याची वेळ का आली. याबाबत सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर व्हिडिओची चर्चा
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विमान रद्द झाल्यावर प्रवाशांना कोणत्या सुविधा मिळायल्या हव्यात, यावर चर्चा सुरू झाली आहे. विमान उशिरा झालं किंवा रद्द झालं तर प्रवाशांना वेळेवर माहिती देणं आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणं किती महत्त्वाचं आहे. हा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.
विमान प्रवासासाठी तिकिट काढल्यानंतर प्रवाशांना वेळ,पैसा आणि नियोजन यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे अचानक विमान रद्द झाल्यास त्यांना योग्य माहिती आणि मदत मिळणं अपेक्षित असतं. या घटनेचा व्हिडिओ सध्या चर्चेत असला तरी विमान रद्द होण्यामागचं नेमकं कारण आणि प्रवाशांना देण्यात आलेल्या पर्यायी व्यवस्थेबाबत अधिकृत माहिती समोर येणं महत्त्वाचं आहे.