कोळी नव्हे चित्रकारच जणू! पाहणाऱ्यालाही अडकवतो आपल्या ‘जाळ्या’त, Video Viral

प्रदीप गरड

Updated on: Jan 31, 2022 | 1:49 PM

संगणक (Computer) विकत घेण्यासाठी धडपडण्यापासून ते जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपनीत काम करण्यापर्यंत, या महिलेची कहाणी ही सर्वात प्रेरणादायी गोष्ट आहे जी तुम्ही वाचल्याशिवाय राहणार नाहीत. शाहिना अत्तरवाला, ज्या मायक्रोसॉफ्ट(Microsoft)मध्ये प्रॉडक्ट डिझाइन मॅनेजर (Product Design

कोळी नव्हे चित्रकारच जणू! पाहणाऱ्यालाही अडकवतो आपल्या 'जाळ्या'त, Video Viral
जाळं विणणारा कोळी

Spider Video : काही तरी वेगळं असेल तर ते सोशल मीडियावर व्हायरल होतंय. म्हणजेच आश्चर्यकारक कारनामे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात, परंतु प्राण्यांच्या कारनाम्यांनाही यात जागा असते. केवळ प्राण्यांशी संबंधित छान असे व्हिडिओच नाही तर लोकांना अनेक विचित्र व्हिडिओ(Weird Videos)देखील आवडतात. आजकाल असाच एक व्हिडिओ इंटरनेट जगतात धुमाकूळ घालत आहे. जे पाहिल्यानंतर तुम्हाला आवडेल आणि आश्चर्यही वाटेल. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कधी ना कधी कोळ्याचं जाळं पाहिलं असेलच. पण, तुमच्यासमोर जाळं विणताना तुम्ही कधी स्पायडर (Spider) पाहिला आहे का? नक्कीच फार कमी लोकांनी ते पाहिलं असेल. सोशल मीडिया(Social Media)वर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) होतोय, ज्यामध्ये एक कोळी आपलं जाळं विणत आहे, जणू चित्रकार आपली कलाकृती दाखवत आहे!

चित्रकारच जणू

कोळ्यानं जाळं विणण्यासाठी आधी रिकाम्या जागेच्या मध्यभागी एकच जाळे बनवलं आणि नंतर हळूहळू आतला भाग एका वर्तुळात विणत जाळ्याच्या मध्यभागी पोहोचल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. ही क्लिप पाहिल्यावर एखादा चित्रकार कागदावर त्याच्या चित्रकलेचा नमुना दाखवतोय, असं वाटतं!

ट्विटरवर शेअर

ज्यानं हा व्हिडिओ पाहिला तो थक्क झाला. लोकांचा क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसेना. हा व्हिडिओ ट्विटरवर आयएएस अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी शेअर केला आहे. सोशल मीडियावर लोक या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून दिल्या जात आहेत.

‘एकही चूक नाही’

एक यूझर म्हणाला, ‘वाह! मला माहीत नव्हतं, की कोळी इतक्या वेगानं जाळं विणतो.’ दुसऱ्या यूझरनं लिहिलंय, ‘कोळ्यानं इतकं अप्रतिम जाळं विणलं आहे, की त्यात एकही चूक दिसत नाही.’ दुसऱ्या यूझरनं व्हिडिओवर कमेंट करत लिहिलं, ‘गजब की कलाकारी है ये तो.’

Shocking Video Viral : स्विमिंग पूलशेजारी खेळत होती चिमुरडी आणि अचानक…

मुंबईतली एक झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्ट डिझाइन मॅनेजर! वाचा, महिलेचा थक्क करणारा असा प्रेरणादायी प्रवास

थंडीनं कुडकुडत होती चिमुरडी, देवदूत बनून एकानं केली मदत; हृदयस्पर्शी Video Viral

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI