Shocking Video Viral : स्विमिंग पूलशेजारी खेळत होती चिमुरडी आणि अचानक…

प्रदीप गरड

Updated on: Jan 31, 2022 | 12:47 PM

सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ (little girl video) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो प्रत्येक पालकां(Parents)नी पाहायला हवा. व्हिडिओमध्ये एक मुलगी घरातून बाहेर पडते आणि स्विमिंग पूलमध्ये पडते. यानंतर जे काही घडते ते आणखी धक्कादायक आहे. हा व्हिडिओ पाहताना आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

Shocking Video Viral : स्विमिंग पूलशेजारी खेळत होती चिमुरडी आणि अचानक...
खेळता खेळता चिमुरडीचा पाय घसरला आणि स्विमिंग पूलमध्ये पडली

Child fall in swimming pool : लहान मुलं आणि त्यांच्याशी संबंधित व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असतात. घरात लहान मुलं असणं कोणाला आवडत नाही? मुलं नसलेलं घर म्हणजे निर्जीव मानलं जातं. पण ज्या घरांमध्ये लहान मुलं असतात, त्या घरातील सदस्यांची मुलांप्रती जबाबदारीही खूप वाढते. कारण ही मुलं खोडकर आणि खेळकरही असतात. त्यांना एकाच ठिकाणी राहणं आवडत नाही. सध्या सोशल मीडियावर एका चिमुकलीचा व्हिडिओ (little girl video) खूप व्हायरल (Viral) होत आहे, जो प्रत्येक पालकां(Parents)नी पाहायला हवा. व्हिडिओमध्ये एक मुलगी घरातून बाहेर पडते आणि स्विमिंग पूलमध्ये पडते. यानंतर जे काही घडते ते आणखी धक्कादायक आहे. हा व्हिडिओ पाहताना आपल्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.

भयानक दृश्य

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की एक लहान मुलगी घरातून बाहेर पडते आणि स्विमिंग पूलजवळ येते. पण पुढच्याच क्षणी जे काही घडते, ते पाहून आपल्याला धक्का बसतो. स्विमिंग पूलजवळ येताच ती मुलगी त्यात उतरते तिचा पाय घसरतो आणि रडायला लागते. दुसरीकडे मुलगी पडल्याचा आवाज ऐकून वडील धावत स्विमिंग पूलकडे येतात आणि लगेच उडी मारून मुलीला बाहेर काढतात. सुदैवानं, मुलीला काही झालं नाही, परंतु हे खरोखरच भयानक दृश्य आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

चिमुरडीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर _.nnn.zziii नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. यूझरनं कॅप्शनमध्ये लिहिलंय, की ‘शुक्र है ऊपरवाला सबकुछ देख रहा है.’ काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 29 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे. त्याच वेळी, व्हिडिओ पाहिल्यानंतर, लोक त्यांच्या संबंधित प्रतिक्रियाही देत आहेत.

पालकांवर संतापले यूझर्स

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक मुलीच्या पालकांवर संतापले आहेत. एका यूझरनं कमेंट करत लिहिलंय, की हे बेजबाबदार पालकत्व आहे. मुलीसोबत कोणतीही अनुचित घटना घडली नाही, यासाठी देवाचे आभार. त्याचवेळी दुसरा यूझर म्हणतो, की मुलीनं स्विमिंग पूलमध्ये पडताच ती पोहायला लागली, हे पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. तिचे पालक खूपच बेजबाबदार आहेत.’ दुसर्‍या यूझरनं टिप्पणी केली, जर मुलं स्विमिंग पूलच्या आसपास असतील तर पालकांनी गाफील राहू नये. तुमची नजर नेहमी मुलांकडे असायला हवी.’ एकंदरीत, हा व्हिडिओ पालकांसाठी एक धडा आहे.

थंडीनं कुडकुडत होती चिमुरडी, देवदूत बनून एकानं केली मदत; हृदयस्पर्शी Video Viral

Viral Video : ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी’वर गातोय हा गोड मुलगा, बोबडे बोल ऐकून चिमुकल्याच्या प्रेमात पडाल!

Nagpur Butterfly Video : विदर्भातलं बोलणारं फुलपाखरू पाहिलंय? अॅपच्या माध्यमातून साधतंय संवाद

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI