Video: गोणीवर बॅक फ्लिप आणि गोणी पाठीवर टाकून थेट गोदामात, कामात मजा घेणारा मजूर पाहून नेटकरी भारावले!

हातगाडीवर अनेक गोण्या या व्हिडीओत दिसत आहे. तेवढ्यात एक कामगार येतो, बॅक फ्लिप मारतो, आणि गोणी पाठीवर टाकून ती सहजपण घेऊन जातो.

Video: गोणीवर बॅक फ्लिप आणि गोणी पाठीवर टाकून थेट गोदामात, कामात मजा घेणारा मजूर पाहून नेटकरी भारावले!
कामात आनंद घेणारा मजूर

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ असे आहेत की जो कोणी हे व्हिडीओ पाहतो त्याचे मन खूप आनंदी होते. असे बरेच लोक आहेत जे कठोर परिश्रम करतात, तसेच त्यांच्या कामाचा खूप आनंद घेतात. असे काही लोक असतात, जे मन न लावता स्वतःचे काम करतात, पण मजा तेव्हा येते, जेव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे काम पूर्ण मनाने, आवडीने आणि आनंदाने करता. (Stunt in Work Man did amazing trick to lift the sack ips said fun with work funny viral video)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या व्यक्तीची मेहनत, समर्पण आणि आनंद पाहू शकता. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती आपले काम खूप मेहनतीने करत आहे, पण ज्या पद्धतीने तो त्याचे काम करत आहे, ते खरोखरच विलक्षण आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून, सोशल मीडिया यूजर्सना आवडत आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीचे लोक कौतुक करत आहेत. हातगाडीवर अनेक गोण्या या व्हिडीओत दिसत आहे. तेवढ्यात एक कामगार येतो, बॅक फ्लिप मारतो, आणि गोणी पाठीवर टाकून ती सहजपण घेऊन जातो.

व्हिडीओ पाहा:

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तुम्ही आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ पाहू शकता. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले – कामही करा, मजा करा. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. एका यूजरवर कमेंट करताना लिहिले – हा कामगार हुशार आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले – हे खरंच आहे, की मनापासून केलेलं कुठलंही काम चांगलंच होत असतं.

हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो वेळा पाहिला गेला आहे. कामात मजा घेतली तर, अवघड कामही किती सोपं आणि मजेदार होऊ शकतं हेच या व्हिडीओतून कळतं. अशा प्रकारे आपलं मनही कामात गुंतून राहतं आणि कामात अडचणही येत नाही. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक इमोजीही पाहायला मिळत आहेत.

हेही पाहा:

Viral Video: पर्यटकांच्या गाडीवर हत्तींचा हल्ला, गाडी उलटवली आणि त्यानंतर जे झालं, त्याने अंगावर शहारे येतील!

Video: मालकाने चेहऱ्याला साबण लावला, आणि कुत्र्याने पाणी बंद केलं, पाहा कुत्र्याच्या हुशारीचा भन्नाट व्हिडीओ!

 

Published On - 2:08 pm, Thu, 2 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI