Video: गुडघाभर पाण्यात सूर मारायला गेला, आणि तोंडावर आपटला, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल!

खरं म्हणजे या तरुणाने आधी पाणी किती आहे याचा अंदाजच घेतला नाही, आणि असा अंदाज न घेता पाण्यात सुर मारण्याचा प्रयत्न केला. आता गुडघाभर पाण्यास सूर मारायला जाल, तर तोंडावर आपटणार नाही तर काय होणार?

Video: गुडघाभर पाण्यात सूर मारायला गेला, आणि तोंडावर आपटला, व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल!
सूर मारला आणि तोंडावर आपटला

स्टंट दाखवणं हे प्रत्येकाच्याच कामाचं नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते, मग कुठेतरी स्टंट जमू लागतो. पण स्टंट करण्यात तुम्ही कितीही परिपूर्ण झाले, तरी एखादी चूकही तुमच्या अंगाशी येऊ शकते. अनेक वेळा स्टंटबाजीमुळे लोकांना गंभीर दुखापत होते, त्यानंतर उठणं-बसणंही कठीण होऊन जातं. असाच एक स्टंट व्हिडिओ, सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका तरुणाने जबरदस्त स्टंट तर केला, पण तोच स्टंट त्याच्या अंगाशी आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. (Stunt Video Man got hurt while performing stunts in water shocking video viral funny video)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण धावत येतो, स्टंट दाखवत फ्लिप करतो आणि पाण्यात उडी मारतो. पण ज्या पाण्यात तो उडी मारतो, ते पाणी इतकं कमी असतं की, तो थेट तोंडावर आदळतो. या व्हिडीओत पाहून सहज कळतं की, या तरुणाला किती दुखापत झाली असेल. तरुणाची मान पूर्णपणे तळाला आदळते आणि त्या उलटा होऊन पडतो. पण पाणी कमी आहे हे त्याला तेव्हा कळतं, जेव्हा खूप उशीर झालेला असतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ:

खरं म्हणजे या तरुणाने आधी पाणी किती आहे याचा अंदाजच घेतला नाही, आणि असा अंदाज न घेता पाण्यात सुर मारण्याचा प्रयत्न केला. आता गुडघाभर पाण्यास सूर मारायला जाल, तर तोंडावर आपटणार नाही तर काय होणार? हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर सुरेंद्र_सुरू या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 26 मिलीयन व्ह्यूज मिळाले आहेत, तर 13 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका यूजरने लिहले ‘भावाला चांगलंच लागलं असेल’ , तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, ‘नशा करुन स्टंट केलं की, हे असं होतं’.

हेही पाहा:

Video: दबा धरुन बसलेल्या कुत्र्याला बकरीने धू धू धुतलं, व्हिडीओ पाहून नेटकरी लोटपोट!

world’s funniest joke | जगात भारी ! सर्वात लोकप्रिय जोक तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या या संबंधी माहिती

Published On - 2:16 pm, Tue, 7 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI