Suryakumar Yadav SKY: वन अँड ओन्ली सूर्यकुमार यादव! रोहीत शर्माचं जुनं ट्विट, विराट कोहली आणि जेठालाल सगळेच कौतुक करतायत SKYचं

Suryakumar Yadav Century: कालच्या मॅचनंतर सोशल मीडियावर चाहते अक्षरशः पेटून उठलेत. सूर्यकुमार यादवची जबरदस्त खेळी बघून लोकांनी त्याला डोक्यावर घेतलंय.

Suryakumar Yadav SKY: वन अँड ओन्ली सूर्यकुमार यादव! रोहीत शर्माचं जुनं ट्विट, विराट कोहली आणि जेठालाल सगळेच कौतुक करतायत SKYचं
Suryakumar Yadav SKY
Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 11, 2022 | 11:13 AM

Suryakumar Yadav Century: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाचा (INDvsENG) मधल्या फळीतील स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने आपल्या बॅटचे कसब दाखवले. यादवने इंग्लंडविरुद्ध टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 55 चेंडूत 6 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 117 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा तो भारताचा दुसरा क्रिकेटर ठरला आहे. या शतकामुळे तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक झळकावणारा 5वा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी सुरेश रैना, रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल आणि दीपक हुड्डा यांनी ही कामगिरी केली आहे. कालच्या मॅचनंतर सोशल मीडियावर चाहते अक्षरशः पेटून उठलेत. सूर्यकुमार यादवची जबरदस्त खेळी बघून लोकांनी त्याला डोक्यावर घेतलंय. #SuryakumarYadav (Suryakumar Yadav SKY) ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग आहे आणि चाहते या हॅशटॅगसह स्वतःच्या प्रतिक्रिया देत आहेत. बघुयात, काय चालू आहे सोशल मीडियावर…

1) वन अँड ओन्ली सूर्यकुमार यादव

2) वन मॅन आर्मी!

3) सूर्यकुमार खेळत असताना इंग्लंडचे झालेले हाल…

4) रोहीत शर्माचं खरं ठरलेलं जुनं ट्विट!

5) मुंबई इंडियन्सचं नाव येणार नाही असं होईल का?

6) जेठालाल कोहली आणि सूर्यकुमार यादव

(ही बातमी केवळ मनोरंजनासाठी आहे. कुणाच्याही भावना दुखवायचा हेतू नाही.)