AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशेत धूंद नवरदेव वधूऐवजी सासूलाच घालू लागतो वरमाला, पुढे काय होतं? पाहा Viral video

Bride groom video : सध्या सोशल मीडियावर (Social media) लग्नाचा (Wedding) असा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून यूझर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये वर नशेत दिसत आहे.

नशेत धूंद नवरदेव वधूऐवजी सासूलाच घालू लागतो वरमाला, पुढे काय होतं? पाहा Viral video
नशेत असलेला वर वधूऐवजी सासूलाच घालू लागतो वरमालाImage Credit source: Instagram
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Apr 01, 2022 | 2:28 PM
Share

Bride groom video : लग्नाचे व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. लग्नाचे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. जर व्हिडिओ वधू-वराशी संबंधित असेल तर लोक मोठ्या उत्साहाने तो पाहतात. लग्नाच्या निमित्ताने होणारा गोंधळ तुम्ही अनेकदा पाहिला असेल. अनेकदा मिरवणुकीत अनेकजण दारू पिऊन गोंधळ घालतात. विचार करा दारू पिऊन वर आला आणि नवरीऐवजी सासूला हार घालून आला तर काय होईल? सध्या सोशल मीडियावर (Social media) लग्नाचा (Wedding) असा एक व्हिडिओ व्हायरल (Viral) होत आहे, जो पाहून यूझर्स आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये वर नशेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, की वर इतका नशेत आहे, की त्याला आपण काय करत आहोत, हेही समजत नाही. यावेळी तो वधूऐवजी आपल्या सासूला हार घालू लागतो. हा प्रँक व्हिडिओ इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की वधू आणि वर दोघेही लग्नाच्या मांडवामध्ये उभे आहेत. रंगमंचावर वरमालेचा कार्यक्रम सुरू आहे. वर हातात हार घेतलेला दिसत आहे. यानंतर, जेव्हा त्याला वधूला हार घालण्यास सांगितले जाते तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेत वधूऐवजी आपल्या आईला हार घालू लागतो. हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या लोकांनी त्याला अडवले.

नाटकाचा भाग

लोक वराला वधूला पुष्पहार घालण्यास सांगतात. लोकांचे म्हणणे ऐकून वराने डोके हलवले आणि नंतर मोठ्या कष्टाने वधूच्या गळ्यात हार घालण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, तो इतका नशेत होता, की त्याला स्वत:ला सांभाळता आले नाही आणि नववधूला पुष्पहार घालण्यापूर्वीच तो सोफ्यावर पडला. हे पाहून नववधूही आश्चर्यचकित होते. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. व्हिडिओ नाटकाचादेखील भाग असू शकतो.

आणखी वाचा :

#AprilFoolsDay : फुल डे, फुल फन… मीम्स अन् जोक्स, ट्विटरवर साजरा होतोय एप्रिल फूल डे!

Video : रानू मंडल से भी तेज, प्लंबर ते हॉलिवूड..! कसं बदललं बाथरूम सिंगरचं नशीब? वाचा सविस्तर

Real Bahubali : कोणाला जमलं नाही ते यानं ‘करून दाखवलं’; लोक म्हणाले, हाच खरा ‘बाहुबली’, Video viral

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...