VIDEO : लग्नामध्ये नवरीची धडाकेबाज एन्ट्री, वऱ्हाडी मंडळी आश्चर्याने पहातच राहिले…पाहा व्हायरल व्हिडिओ!

VIDEO : लग्नामध्ये नवरीची धडाकेबाज एन्ट्री, वऱ्हाडी मंडळी आश्चर्याने पहातच राहिले...पाहा व्हायरल व्हिडिओ!

आजकाल प्रत्येकाला आपले लग्न (Wedding) खास बनवायचे असते. सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विशेषत: वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ कंटेंटला खूप पसंती दिली जाते. कधी एखादा गोंडस क्षण व्हायरल होतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 05, 2022 | 10:01 AM

मुंबई : आजकाल प्रत्येकाला आपले लग्न (Wedding) खास बनवायचे असते. सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. विशेषत: वधू-वरांशी संबंधित व्हिडिओ कंटेंटला खूप पसंती दिली जाते. कधी एखादा गोंडस क्षण व्हायरल होतो, तर कधी नववधूच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या एका लग्नाचा असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वधू खास एन्ट्री घेतला दिसत आहे.

नवरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू जीप चालवत लग्नाच्या ठिकाणी दाखल होते. काही सेकंदांच्या या व्हिडीओची सर्वात खास गोष्ट म्हणजे वधू स्वतः जीप चालवत आहे. यासोबतच तिची बहीण नववधूच्या शेजारी बसली आहे, तिच्या हातात एक बॅनर आहे, ज्यावर लिहिले आहे, ‘जर तुम्ही माझ्या बहिणीशी लग्न करत आहात तर त्याची किंमत तुम्हाला द्यावी लागेल. मागे वधूचा भाऊही ढोलाच्या तालावर डान्स करताना दिसतो आहे.

नववधूची ही एन्ट्री लोकांना खूप आवडली आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, ‘आयला! ही पूर्णपणे फिल्मी स्टाईल आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘माझ्यासाठी ही आतापर्यंतची वधूची सर्वात भारी एंट्री आहे.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी त्यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. हा खास मजेदार व्हिडिओ इंस्टाग्राम पेज theadorableweddings ने शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : चिमुकल्याने टिचरसमोर गायले ‘गुलाबी आंखे जो तेरी देखी…’ पाहा पुढे काय झाले!

Viral Video | गाय-कुत्रा एकमेकांच्या मिठीत, गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें