Viral Video | गाय-कुत्रा एकमेकांच्या मिठीत, गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Viral Video | गाय-कुत्रा एकमेकांच्या मिठीत, गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
VIRAL VIDEO

सोशल मीडियावर कुत्र्यांचे व्हिडीओ आवडाने पाहिले जातात. मात्र सध्या व्हायरल होत असेलेल्या व्हिडीओमध्ये कुत्र्यासोबत एक गायसुद्धा आहे. हे दोघेही जमिनीवर अगदीच शांतपणे बसले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 05, 2022 | 7:06 AM

मुंबई : सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. यातील प्राणी आणि पक्ष्यांचे व्हिडीओ तर आवडीने पाहिले जातात. प्राण्यांनी केलेली धम्माल तसेच मस्ती नेटकऱ्यांना आवडते. कदाचित याच कारणामुळे अशा व्हिडीओंना पसंदी मिळते. सध्या तर एक गाय आणि कुत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल.

कुत्रा आणि गाय एकमेकांच्या मिठीत

सोशल मीडियावर कुत्र्यांचे व्हिडीओ आवडाने पाहिले जातात. मात्र सध्या व्हायरल होत असेलेल्या व्हिडीओमध्ये कुत्र्यासोबत एक गायसुद्धा आहे. हे दोघेही जमिनीवर अगदीच शांतपणे बसले आहेत. कशाचाही चिंता न करता व्हिडीओमधील कुत्रा डोळे मिटून शांतपणे बसला आहे. तर गायसुद्धा डोळे मिटून रवंथ करत आहे. हा व्हिडीओ एका शेतातील असावा असा अंदाज बांधण्यात येत आहे. कुत्रा आणि गायीच्या मागे काही कोंबड्यादेखील दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कुत्रा आणि मांजर जणू खूप वर्षांपूर्वीचे मित्र असल्याचे वाटत आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स 

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. व्हिडीओ पाहून प्राण्यांनासुद्धा जीव आणि भावना असतात असे नेटकरी म्हणत आहेत. तर प्राणीदेखील एकमेकांना जीव लावतात अशी मार्मिक प्रतिक्रिया दुसऱ्या एका नेटकऱ्याने दिली आहे. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र त्याला Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 52 हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहेत. तसेच मजेदार प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरदेखील उत्स्फूर्तपणे शेअर केले आहे.

इतर बातम्या :

VIDEO : अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! चक्क एका मुलीने घेतली चित्त्याची किस्स…व्हिडीओ पाहून अवाक व्हाल

VIDEO : काय सांगता…! चक्क माणसाप्रमाणे माकडाने घातली त्याच्या तान्हुल्या लेकराला अंघोळ!

VIDEO : जब घी सीधी उंगली से ना निकले तो…! मेट्रोमध्ये जागा मिळवण्यासाठी मुलीने केला खतरनाक स्टंट, तरूणालाही मिळाली शिक्षा!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें