VIDEO : आर्श्चयकारण! 22 वर्षीय तरुणीला दुरूनच दिसला मानेवर तीळ…तिने सांगितले तुम्हाला कॅन्सर आहे आणि पुढे धक्कादायक घडले!

VIDEO : आर्श्चयकारण! 22 वर्षीय तरुणीला दुरूनच दिसला मानेवर तीळ...तिने सांगितले तुम्हाला कॅन्सर आहे आणि पुढे धक्कादायक घडले!
मॅचदरम्यान गळ्यावरील तीळ पाहून तरूणीने सांगितले तुम्हाला कॅन्सर आहे.

कोणत्याही डॉक्टरांची (Doctor) चाणक्य नजर असते. एक शेकंदामध्ये रुग्णाकडे (Patient) पाहून डॉक्टरांना समजते की नेमका याला आजार काय आहे. त्यानंतर डाॅक्टर आपल्या रूग्णांना विविध टेस्ट करायला सांगतात आणि त्या आजारावर उपचार करतात.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 04, 2022 | 10:18 AM

मुंबई : कोणत्याही डॉक्टरांची (Doctor) चाणक्य नजर असते. एक शेकंदामध्ये रुग्णाकडे (Patient) पाहून डॉक्टरांना समजते की नेमका याला आजार काय आहे. त्यानंतर डाॅक्टर आपल्या रूग्णांना विविध टेस्ट करायला सांगतात आणि त्या आजारावर उपचार करतात. मात्र, दिवस होता 23 ऑक्टोबर 2021 आणि आ. सी. ई हॉकी (Ice hockey) मॅच एकदम जबरदस्त रंगात आला होता. हा मॅच बघण्यासाठी एक 22 वर्षीय मेडिकलची विद्यार्थींनी देखील आली होती.

मॅचदरम्यानच तरूणीने केला मेसेज टाईम

याच मॅच दरम्यान या 22 वर्षीय मेडिकलच्या विद्यार्थींनीने तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीच्या मानेवर एक तीळ (Mole) बघता आणि तिला धक्काच बसला. तिला वाटले की, तो तीळ कॅन्सरचाच आहे. मग ती तरूणी धावपळ करण्यास सुरूवात करते. मॅच चालू असेपर्यंत ती एक मेसेज टाईप करते. त्यामध्ये ती त्या व्यक्तीला हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की, तुमच्या मानेवर जो तीळ आहे. त्यानुसार तुम्हाली कॅन्सर असण्याची शक्यता आहे. ती तरूणी बऱ्याच वेळ आपला मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करते. मात्र, तिचा मेसेज त्या व्यक्तीपर्यंत जात नाही.

मग शेवटी ती ज्याठिकाणी हा व्यक्ती बसलेला आहे. तिथे पोहचते आणि काचेमधून त्या व्यक्तीला हा मेसेज दाखवते. मात्र, तो व्यक्ती या तरूणीच्या मेसेज वाचतो आणि दुर्लक्ष करतो. या तरूणीचे नाव नादिया पोपोविकी (Nadia Popovici) असे आहे आणि ती मेडिकलची विद्यार्थींनी आहे. ज्याच्या गळ्यावर तीळ होता, तो व्यक्ती दुसरा-तिसरा कोणी नसून तो ब्रायन हॅमिल्टन (Brian Hamilton) होते. जे आ. सी. ई हॉकी टिमचे असिस्‍टेंट इक्‍विपमेंट मॅनेजर आहेत. या तरूणीच्या सांगण्यानंतर त्यांनी टिममधील डाॅक्टरांना या तीळाबद्दल विचारणा केली.

सोशल मीडियावर तरूणीचा शोध

डाॅक्टरांनी त्यांना बायोप्‍सी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी बायोप्‍सी केली आणि त्यामध्ये त्यांना कॅन्सर असल्याचे सिध्द झाले. ब्रायन हॅमिल्टन यांनी त्या तरूणीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांनी सोशल मीडियावर त्या तरूणीला शोधले आणि त्यासाठी त्यांनी काही ट्वीट देखील केले. शेवटी नादिया पोपोविकी त्यांना भेटायला गेली. त्यांनी बऱ्याच वेळा सांगितले आहे की, नादिया पोपोविकीमुळे मला जीवदान मिळाले आहे आणि ती माझ्या आयुष्यामध्ये खूप खास आहे. आज तक ने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे.

संबंधित बातम्या : 

VIDEO : ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्यावर काकूंचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून लोक म्हणाले ‘ओल्ड जनरेशन रॉक’

आला! आला !! आता असाही एक टीव्ही आला ज्याला चाटलं की जेवणाचा आनंद मिळेल, जाणून घ्या या खास टीव्हीबद्दल


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें