आला! आला !! आता असाही एक टीव्ही आला ज्याला चाटलं की जेवणाचा आनंद मिळेल, जाणून घ्या या खास टीव्हीबद्दल

आला! आला !! आता असाही एक टीव्ही आला ज्याला चाटलं की जेवणाचा आनंद मिळेल, जाणून घ्या या खास टीव्हीबद्दल
जेवणाची स्वाद देणारी टिव्ही

जगामध्ये अनेक नवीन टेक्नॉलॉजी निघाल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी कोणी विचार तरी केला होता का? की, सात समुद्र दूर असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपण प्रत्यक्ष एकमेंकांना बघून व्हिडीओ काॅलवर बोलू शकतो. टेक्नॉलॉजीमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. आता तर चक्क जपानमधील एका प्राध्यापकाने एक खास टीव्ही तयार केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 03, 2022 | 2:04 PM

मुंबई : जगामध्ये अनेक नवीन टेक्नॉलॉजी (Technology) निघाल्या आहेत. वीस वर्षांपूर्वी कोणी विचार तरी केला होता का? की, सात समुद्र दूर असलेल्या आपल्या जवळच्या व्यक्तींशी आपण प्रत्यक्ष एकमेंकांना बघून व्हिडीओ काॅलवर बोलू शकतो. टेक्नॉलॉजीमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहेत. आता तर चक्क जपानमधील एका प्राध्यापकाने एक खास टीव्ही तयार केला आहे. त्या टीव्हीचे वैशिष्ट म्हणजे त्या टीव्हीच्या स्क्रीनला आपण चाटू शकतो.

जेवणाचा आनंद देणारी टीव्ही लवकरच बाजारामध्ये

तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, टीव्ही चाटून काय करायचे. टीव्ही तर फक्त बघण्यासाठी असते. मात्र, जपानच्या प्राध्यापकाने टेस्ट द टीवी तयार केला आहे. म्हणजेच त्या टीव्हीवरील दिसणारा खाण्याचा पदार्थ आपण चाटला की, त्या पदार्थांचा सुगंध आणि टेस्ट आपल्याला भेटणार. या प्राध्यापकाचे नाव होमेइ मियाशिता ( Homei Miyashita) असे आहे. त्यांनीच हा भन्नाट टीव्ही काढला आहे. टीव्हीचा स्क्रीन चाटून तुम्ही तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ शकता.

इतक्या रूपयांमध्ये ही टीव्ही खरेदी करू शकता

वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार या टीव्हीमध्ये 10 कॅनिस्टर बसवलेले आहेत, जे ‘हायजीन फिल्म’वर फ्लेवर आहेत. यानंतर ‘चित्रपट’ टीव्हीच्या पडद्यावर येतो जो प्रेक्षकांना चाटता येतो. जर हा टीव्ही बाजारामध्ये आणला गेला तर भारतीय चलनानुसार त्याची किंमत सुमारे 73 हजार असेल अंदाजे. प्राध्यापक मियाशिता यांचे उद्दिष्ट लोकांना घरी बसवून जगाच्या इतर कोणत्याही भागातील रेस्टॉरंटमध्ये दिल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांचा आस्वांद घेती यावा हे आहे.

संबंधित बातम्या : 

Viral : ऐकावे ते नवलच…! चक्क पिटुकल्या माऊचे डोहाळे जेवण, पाहा क्युट फोटो

VIDEO : मनी माऊची भरली शाळा ! शिक्षिका पाहून थक्क व्हाल, पाहा खास व्हायरल व्हिडीओ!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें